अरे गणेश असे किती दिवस चालायचे.

एकमेकांकडे ते विदुषकासारखे पहायचे,

काहीतरी विनोद करून जोरजोरात हसयचे,

त्याचीच आठवण काढुन नंतर बोलत बसायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे. 


वर्गामध्ये सर्वातपुढे आपणच बसायचे,

हळुच खडू तू चोरायचे व नाव माझ्यावर ढकलायचे,

दररोजच खडू आणायलाही मलाच पाठवायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


हळुच मी डोकावून तिच्याकडे पहायचे,

कानातल्या कानात तु मला चिडवायचे,

दररोज तिचेच नाव घेऊन मला रडवायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


शाळेतून चालत चालत घराकडे निघायचे,

अचानक तिचे दर्शन तिचे आम्हाला घडायचे,

एका क्षणाचा विलंबही न करता ‘ वहिनी, वहिनी’ तु ओरडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


मी तीच्यावरती एखादी चारोळी लिहायचे,

गावातल्या गालातच मी तेव्हा हसायचे,

रात्रभर तीच चारोळी तु माझ्या कानात ओरडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


रविवार आला की जेवनाचा बेत करायचे,

शेवटी पनीरमसाल्यावर पोट भरवायचे,

नंतर रात्रभर गावोगाव फिरत  हिंडायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


एखाद्या रात्री संपुर्ण पुस्तक वाचुन काढायचे,

एकेकांना नवनवीन माहिती सांगायचे,

त्याच माहिती वरती नंतर भांडणे करायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


मेस वर जेवताना एकमेकांचे वाट्या लपवायचे,

जबरदस्ती चपात्या खाऊ घालायचे,

नंतर एकमेकांकडे क्रोधाने पाहायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.


एकमेकांपासुन पाचशे किलोमीटर लांब जायचे,

आजही तुझ्यासोबत तासन-तास बोलायचे,

इतकेच नव्हे तर तुझे नाव काव्यसंग्रहाला द्यायचे,

अरे गणेश असे किती दिवस चालायचे.





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.







Comments