आणि फडणवीसांना कोरोनाची लागण झाली.

शेत-शिवारांमध्ये ते सगळीकडे फिरले,

बांधा-बांधावरून ते बेडकांसारखे उड्या मारले,

त्यांची शुगरची सकाळी गोळी घ्यायची राहिली,

आणि फडणवीसांना कोरोनाची लागण झाली.


अध्यक्ष महोदयांसोबत त्यांचा मंत्रालयातच वाद झाला,

त्यांचा ॲप्पलचा मोबाईल कालच चेरीला गेला,

त्यांची मुख्यमंत्र्याची खुर्चीच कोणीतरी पळवली,

आणि फडणवीसांना कोरोनाची लागण झाली.


मी पुन्हा येणार, म्हणुन त्यांनी सगळीकडे नारा दिला,

निवडणुकीचा निकाल त्यांनी स्वप्नात पाहिला,

शेवटी विरोधक म्हणुन त्याची नियुक्ती झाली,

आणि फडणवीसांचे कोरोनाची लागण झाली.


अनेक घोटाळे त्यांनी उघडकीस आणले,

हिलीकॅप्टर मधुन त्यांनी महापुर पाहीले,

कागदपत्रांची सुटकेस कुठेतरी हरवली,

आणि फडणवीसांना करोनाची लागण झाली.


वैद्यकीय निकाल त्यांचा पॅाझीटीव्ह निघाला,

व्यायामाचा निकालाने हिमालयात संन्यासास गेला,

त्यांची कपाडी मास्क रात्रीच्या पाऊसात भिजली,

आणि फडणवीसांना कोरोनाची लागण झाली.


त्यांच्या ॲाफीसमधीस प्रिंटर खराब झाले,

त्यांनी मग पोटभर पंचपक्वानाचे जेवन केले,

सही करायची पार्करची लेखणीच हरवली,

आणि फडणवीसांना कोरोनाची लागण झाली.


ट्विटरवरून ट्विट करत फडणवीसांनी माहिती दिली,

अध्यक्ष महोदयांना त्याची काळजी वाटली,

राज्यपालांनी त्यांची भेट गुगल मीट वरती घेतली,

आणि आमच्या लाडक्या फडणवीसांना कोरोनाची लागण झाली


टीप - फक्त एक विनोदाचा भाग म्हणुन कवितेच्या आशयाचा आस्वाद घ्यावा....

कोणताही राजकीय अर्थ काढू नये. 🙏






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.




Comments