तुला पाहता आज ही....

 कधी-कधी इंस्टाग्रामवरती तुझा फोटो पाहतो,

त्या फोटोला लाईक न करता निघून जातो,

सायंकाळी एकटा असताना तुलाच मी आठवतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


मी माझ्या कामानिमीत्त रस्त्यावरून वाट चालतो,

अचानक पणे मी तुलाच माझ्या समोर पाहतो,

तुझ्या डोळ्यात डोळे मी आज ही मिळवतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


फेसबुक वरती तुझ्या स्टोरीज मी पाहतो,

वॅात्सॲपला दररोज तुझा डि.पी. बघतो,

तुझा मोबाईल नंबर माझ्या ध्यानात बसतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


तुझ्यासोबत मी नेहमी सामान्यपणे बोलतो,

एकेरी प्रेम जरी असले तरी ते भावंडांमध्येच ठेवतो,

शब्दांमधुन मात्र ते मी उत्स्फूर्त व्यक्त करतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


तुझ्यावरती लिहीलेल्या चारोळ्या मी अनुभवतो,

तुझा तो गोड आवाज माझ्या कानात खेळतो,

आभाळातही मी तुझाच चेहरा पाहतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


तुझ्यावरती मी असंख्य कविता लिहतो,

अनेक पंक्ती मी तुझ्यावरतीच रचतो,

माझ्या काव्यसंग्रहास तुझे नाम देतो,

तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो.


तुला पाहता आज ही, मी भान माझे हरवतो,

कामच्यावेळेसही मी तुझा चेहरा आठवतो,

तुझ्या आठवणींमध्ये अक्षरक्ष: आभाळही रडतो,

शेवटी तुला पाहता पाहता मी माझे जीवन घालवतो.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  ( Copyright Amendment Act 2012 ), the author or creator of the work is the first owner of copyright. 


Comments