आणि काळे मांजर आडवे गेले.

रस्त्यावरून मी दुचाकी चालविले,

घाईमध्ये घराचे वाट मी धरले,

माझे ह्रदय भीतीनेच हादरले,

आणि काळे मांजर आडवे गेले.


खुप कष्टाने मी कागदपत्रे गोळा केले,

तहसिलदाराच्या स्वाक्षऱ्या देखील घेतले, 

बँकेकडून कर्ज घेण्यास माझे पाऊले निघाले,

आणि काळे मांजर आडवे गेले.


संपुर्ण वर्षभर मी खुप अभ्यास केले,

हस्ताक्षरसुद्धा माझे खुप सुधारले,

परिक्षेला मेंदुतील घोडे पळाले,

आणि काळे मांजर आडवे गेले.


व्यापारासाठी मी नवी जागा घेतले,

सत्यनारायण देवतेची पुजा देखील केले,

सुर्यनारायण देवतेकडे प्रर्थना केले,

आणि काळे मांजर आडवे गेले.


समाजसुधारकांनी त्यांचा घसा कोरडा केले,

हजारो पुस्तकांनी आम्हाला ज्ञान दिले,

तरी पण अंधश्रद्धेचे बीज समाजात पेरले,

आणि काळे मांजर आडवे गेले.


हो काळे मांजराने रस्ता आोलांडले,

मानवाने त्याकडे अंधश्रद्धेने पाहिले,

जादु-टोण्याचा मार्ग त्यानेच निवडले,

त्यात काळ्या मांजराचे काय बरे चुकले.?



समर्पीत : स्व. डॅा. नरेंद्र दाभोळकर यांच्या आठवणींत…



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.




Comments

  1. Masttt...ekdam barobar✌️👌

    ReplyDelete

Post a Comment