पहाटे सुर्यदेवतेला प्रार्थना करायचे,
तुझ्या घराकडे तासन-तास पहायचे,
मला पाहताक्षणी तु लपून बसते,
आणि तु कुठे तरी हरवूनच जाते.
त्या पुस्तकांच्या गठ्यात तुला शोधायचे,
अन् वाक्यांच्या विळख्यात स्वत: अडकायचे,
माझ्या कलागुणांना तु जपते,
आणि तु कुठे तरी हरवूनच जाते.
सदैव त्या प्रकाशाच्या वेगाने धावायचे,
वेळेपक्षाही पुढे जाऊन जगायचे
माझ्या आनंदाच्या क्षणांमध्ये तुच नसते,
आणि तु कुठे तरी हरवूनच जाते.
भावनांच्या जगामध्ये तुला घेऊन जायचे,
एका फुलपाखरासारखे तुलाच पहायचे,
त्या फुलांमध्ये सौंदर्य तुझे शोभते,
आणि तु कुठे तरी हरवून जाते.
वाटेवरती चालताना काचा पसरले,
माझ्या पाऊलांसोबत तुझे पाऊल पडले,
दु:खा मध्ये तु नेहमी माझा साथ देते,
आणि तु कुठे तरी हरवून जाते.
आनंदामध्ये मला एकटेच सोडते,
डोळ्यातलं दुःख डोळ्यातच संपवते,
डोळ्यात डोळे घालुनी तु पाहते,
आणि तु कुठे तरी हरवून जाते.
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Comments
Post a Comment