काही आठवणी तुझ्या आजही आठवतात.

आयुष्यभर मी सुध्दा वेळेमागेच धावतो,

त्यापासुन मी भरमसाठ पैसाही कमावतो,

जुन्या कविता आजही तुझ्याकडेच पाहतात,

काही आठवणी तुझ्या आजही आठवतात.


तुझ्या नाजुक ओठांवरील हास्य मला वेड लावते,

तुझे ते प्रेमळ डोळे मला नजर लावते,

त्या खिडकीतून माझे डोळे तुलाच पाहताच,

काही आठवणी तुझ्या आजही आठवतात.


त्या लाजाळुच्या झाडाप्रमानेच तु खुप लाजते,

फुलपाखरासारखे लगेचच बागेमध्ये हरवते,

त्या एकांताच्या वाटेवरती माझे शब्द तुलाच शोधतात,

काही आठवणी तुझ्या आजही आठवतात.


ह्रदयातले ॲाक्स्टोसीन सगळीकडे पसरते,

त्याचाच सुगंध तो आयुष्यभर दरमळते,

तुझ्याबद्दल ते वाक्य नेहमी मला खुणावीत,

काही आठवणी तुझ्या आजही आठवतात.


तुला नेहमी नेहमी पाहतच रहावे वाटते,

ताऱ्यांच्या जगात माझे मनच हरवते,

तु दिसली की, डोळे तुलाच पाहत बसतात,

काही आठवणी तुझ्या आजही मला आठवतात.


काही आठवणी तुझ्या आजही मला आठवतात,

त्या सर्व आठवताच माझे डोळे ओले करतात,

जरी अश्रू प्रेमाचे असले तर तेखेच लपावतात,

तुझ्या आठवणी आठवतां आठवतां, ह्रदयच थांबतात.




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.




Comments

Post a Comment