एका कवीशी बोलत होती कविता.

नद्या, सरोवर व तलाव सर्व आटले,

हिरवळीच्या जागाच ईथुनतिथे मिटले,

आज ह्या दुःखी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


आज मोठमोठे यंत्रमानव तयार झाले,

परग्रहवासींसोबत मानवाने संबंध बांधले,

आज ह्या अनोळख्या जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


घारेच्या मानेवरती कावळा चोच मारतो,

तरी सुध्दा कावळाच बेशुद्ध पडतो,

आज ह्या मतलबी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


प्रचंड लावा बाहेर टाकून ज्वालामुखी फुटतो,

प्रण्यांचा विचारही न करता जंगलात वणवा पेटतो,

आज ह्या क्रोधी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


फक्त सोन्याचाच खाणी मानव शोधतो,

हिऱ्यामोतींसोबत तो देवाण-घेवाण करतो,

आज ह्या लेखी जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


पृथ्वीने मानवास सर्वकाही दिले,

पण मानवाने फक्त प्रदुषन पसरवले,

ह्या अन्यायकारक जगाकडे पाहता,

एका कवीशी बोलत होती कविता.


सर्व गोष्टी कविताने स्वत: पाहिले,

ते पाहतांना तिच्या डोळ्यात अश्रू आले,

मानवाचे जुलमी भविष्य पाहता,

एका कवीशी बोलती होती एक कविता.





विषय सुचविणारे - प्रणय बनगडे ( रा. रत्नागिरी ) 

कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



 

Comments

  1. khupach chaan lihili kavita........kavita ek kavila ky manali khup chhan mandale

    ReplyDelete

Post a Comment