काही न बोलताच ती निघुन जाते.

खुप वेळानंतर ती मला तासनतास बोलते,

माझ्या कवितेंकडे प्रेमाने पाहतच बसते,

परंतु दररोज खिडकीतून डोकाऊन पाहते,

अन् काही न बोलताच ती निघुन जाते.


मी लिहिलेल्या अक्षरांवरून हात फिरवते,

माझ्यावरती लिहिलेल्या कविता लपवते,

माझ्या प्रेमकवितांना ती अनुभवते,

अन् काही न बोलताच ती निघुन जाते.


सनउत्सवाला तिच्या हातावरती मेहंदी काढते,

पहिल्यांदा नाव लिहीते व पुसूनही टाकते,

डोळ्यांमधूनच ती नजर मिटवते,

अन् काही न बोलताच ती निघुन जाते.


रात्रभर त्या चंद्राकडे पाहत बसते,

चांदण्यांसोबत एकटीच बडबडत बसते,

मंद वाऱ्यात ती नवे विचार कोरते,

अन् काही न बोलताच ती निघुन जाते.


समुद्रकिणारी बसुन शंख-शिंपले गोळा करते,

सागरीलाटांमागे वेड्यासारखे धावते,

प्रेमाचे ठसे त्या रेतीमध्ये उमटवते,

अन् काही न बोलताच ती निघुन जाते.


एकटेपणात नेहमी माझ्या सोबतच राहते,

हातात हात ठेऊन मनातील भावना ओळखते,

एक पुस्तक आणुन माझ्या हातात ठेवते,

शेवटी काही न बोलताच ती नेहमी निघुन जाते.





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments