विराम चिन्हे

लेखकांनी नवनविन लेख लिहीले,

वाचकांनी ते लेख वाचुन काढले,

जीवनामध्ये त्यांना बदल घडवले,

त्यास आता पुर्णविराम मिळाले.


सुर्याने पश्चिमेकडे प्रस्थान चालू ठेवले,

पहाटे कोकीळेने गायन चालू केले,

अनेक गोष्टी तेथेच हजर झाले,

त्यावेळेस स्वल्पविराम उपयोगी पडले.


लोकशाहीची अंमलबजावणी चालवले,

अनेक गोष्टी मानवापासुनच लपवले,

हजारो प्रश्न तेथे तेव्हा विचारले  गेले,

तेव्हा प्रश्नचिन्हा तेथे उपस्थित झाले.


आर्यभट्टाने अमूल्य शुन्याचा शोध लावले,

न्युटनने गुरूत्वाकर्षनाचे नियम सांगितले,

तरी सुध्दा अवकाश विज्ञान अर्धवट राहिले,

त्यामुळे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह जोडले.


सेकंदा मागे सेकंद जोरात धावले,

पहिला पोटोभा म्हणत जेवण आम्ही केले,

परंतु काम आम्ही मात्र अर्धवटच ठेवले,

आणि वाक्याच्यी शेवटी अर्धविराम आले.


ईश्वराने ह्या महामानवास विचार सुचवले,

तेच विचार ह्या लेखणीतून पुस्तकात उतरले,

पुस्तकांनी  विचार अनोख्या रितीने प्रकट केले,

तेथे विचारांना अवतरण चिन्ह सापडले.


कलियुगात भावनांचे छत्रच बदलले,

प्रश्नचिन्ह व पुर्णविरामच पाहायला मिळाले,

उद्गारवाचक चिन्हावनेतर निवृत्ती घेतले,

मोबाईल मुळे विरामचिन्हेच कायमचे हरवले.




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments