काहीतरी हरवलंय...

 सर्व ग्रह नवलाने विचार करतात,

मानव पृथ्वीवरचं का बरे राहतात ?

पृथ्वीच्या डोळ्यांमध्ये मी अश्रू पाहिलंय,

आणि खरचं काहीतरी हरवलंय..


दररोज वेळेपुर्वी सुर्याचा उदय होतो,

भेदभाव न करता सर्वांना सुर्यप्रकाश देतो,

डोगंरदऱ्यांमागे सुर्याला लपताना मी पाहिलंय,

आणि खरंच काहीतरी हरवलंय...


ऊन्हाळ्यापासुनची तहान तो मिटवतो,

तापलेल्या भुमीवरती हिरवळ तो पसरवतो,

बरसत्या नभाला रडताना मी पाहिलंय।

आणि खरचं काहीतरी हरवलंय...


रडणाऱ्या प्रत्येक बाळाचा चंदामामा होतो,

प्रियकर-प्रेयसीच्या आठवणी ताज्या करतो,

अमावश्येस चंद्राला लपताना मी पाहिलंय,

आणि खरचं काहीतरी हरवलंय...


रात्रीच्या अंधारात तिचेच राज्य चालते,

नभां-नभांमध्ये जोरदार भांडणे लावून देते,

त्याच विजेला गरजताना मी पाहिलंय,

आणि खरचं काहीतरी हरवलंय...


पहाटेच्या सुर्यप्रकाषात हिऱ्यासारखे चकाकतात,

फुलपाखरांना खेळण्यासाठी बोलवतात,

तळावरील दवबिंदूना दुःखी मी पाहिलंय,

आणि खरचं काहीतरी हरवलंय...


विज्ञानाला अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेलं मी पाहिलंय,

साहित्याच्या विश्वाला बंदिस्त खोलीत मी पाहिलंय,

संपुर्ण जगच मानवामुळे बदललंय,

आणि खरचं काहीतरी हरवलंय...




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments