तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात...

तुझ्या पायातील पैंजन तुझी चाहूल देतात,

हातात वाजणाऱ्या बांगड्या तु आल्याचे सांगतात,

तुला पाहताच डोळे माझे भान हरवतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात...


तुला पाहताच अनेक विचार फुलतात,

तुझ्या गुलाबासारख्या गालात खेळतात,

तुझ्या नाकात सोनेरी नथ खुप शोभतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात...


तुझे प्रेमानेभरलेले डोळे माझ्याकडे पाहतात,

पाहताच मनात तुझ्या सौंदर्यांच्या चारोळ्या सुचतात,

तुझ्या डोळ्यातलं काजळ हिरावा कंदील दाखवितात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात...


तुझ्या कानामध्ये सोनेरी झुंबके झुलतात,

हव्याचा धोका आल्यावर ते वृक्षाप्रमाने डुलतात,

ह्या बोलक्या कवीला ते अबोल करतात,

तुझ्याबद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात...


तुझे ते स्मित हास्य चंद्रास सुध्दा वेड लावतात,

तुझ्या आनंदामध्ये रंगीबेरंगी फुले उमलतात,

त्यामध्ये माझ्या चारोळीचे शब्द हरवतात,

तुझ्या बद्दल लिहीताना शब्दच कुढे उरतात....


आनंदीवेळी हातात हात तुझे पडतात,

एकटेपणात वेड्या मनाला तुझे शब्द साथ देतात,

तुझा मधुर आवाज एकवुन थकवा मिटवतात,

तुझ्या बद्दल लिहीताना शब्दच कुढे गं उरतात......



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments