एक अपुर्ण स्वप्न

नमस्कार, 

मी एक लेखक; लेखक असल्यामुळे काही ना काही लिखाण करत असतो. २०२० आता पुर्णत: संपले आहे, व नव्या वर्षात आपण सर्वांनी प्रस्थान सुध्दा केले आहे. २०२० हे वर्ष सर्व लोकांना वाईट गेले आहे असं लिहीण्यात काही हरकत नाही. २०२० मध्ये काही लोकांना स्वर्गवास झाला, त्या सर्वांना  भावपूर्ण आदरांजली. २०२० मध्ये खुप लोकांनी फिरण्याचा, मौज-मजा करण्याचा बेत केला होता, परंतु त्यांचे ते स्वप्न भंग पावले. काही लोकांचे डॅाक्टर, आय.आय.टी. इंजिनीअर, सायंटिस्ट होण्याचे स्वप्न तुटले. खुप दुःख होते जेव्हा आपले स्वप्न आपल्याच डोळ्यांसमोर मोडले जाते. असेच एक महान स्वप्न, एका महान व्यक्तीने पाहिले होते, वाटचाल सुध्दा केली होती आणि आज आपल्याच कर्तृत्वामुळे हे स्वप्न भंग पावले.


भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्या सर्वांना माहितीत असतील. प्रत्येक शास्त्रज्ञाचे आदर्श, प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रेरणास्थान म्हणुन आजही ते माझ्या मनात आहेत. एक असे महान व्यक्तीमत्त्व ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते,ज्यांनी शेवटच्या क्षणी सुध्दा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यातच वेळ खर्ची केला; त्याच व्यक्तीचे स्वप्न आज आपण भंग केले. ज्या व्यक्तीने अग्नीपंखामधुन देशांतील अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना भरारी दिली, ‘प्रज्वलित मने’ पुस्तकातुन फक्त माझीच नव्हे तर करोडो लोकांची मने भारतरत्न डॅा.कलामांनी प्रज्वलित केली. इतकेच नव्हे तर स्वित्झर्लंडमधील विज्ञान दिवस भारतरत्न डॅा.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या भेटीदिवशी साजरा केला जातो. एका होडी चालकाच्या मुलापासून प्रवास सुरू करुन,वर्तमान पत्र वेक्रेत्या पासुन मिसाईल मॅन पर्यंतचा प्रवास हा भारतातील नव्हे तर संपुर्ण जगातील विद्यार्थ्याला प्रोत्साहित करतो. भारतरत्न डॅा. कलामांच्या नावावरती नासा ने सॅलीबॅसिलस च्या एका स्पेसीजचे नाव सॅलीबॅसिलस कलामी असे ठेवले. भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांबद्दल जेवढे लिहावे तितके खुप कमीच आहे.


आज पाहता-पाहता २०२० संपले. भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांनी एक  स्वप्न पाहिले होते; २०२० पर्यंत भारत महासत्ताक होईल, भारतातील तरुनपिढी ह्या देशाचे नेतृत्व करेल इतकेच नव्हे तर ह्या देशातील तरुन जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारताचे नाव व तिरंगा उंचावेल. २०२० संपले तरी सुध्दा भारत महासत्ताक नाही, भारतातील तरून पिढी भारताला नव्हे तर आपल्या मानास सुध्दा नेतृत्व करत नाहीये. २७ जुलै २०१५ रोजी भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांनी स्वर्गवास केला, त्याचवेळी दुःखाच्या महासागरात संपुर्ण देश कोसळला, आभाळाचे सुध्दा डोळे ओले झाले आणि निर्संगाने आदरांजली अर्पन केली. भारतरत्न डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम सर म्हणाले होते, जेव्हा माझा स्वर्गवास होईल तेव्हा फक्त १ तास शोक माना व बाकिचा वेळ ह्या देशाच्या कार्यासाठी अर्पन करा आणि आम्ही त्यांच्या आदेशाचे पालनही केलं, परंतु नंतर काय? विसरलो आम्ही त्यांना ? विसरलो आम्ही त्यांच्या स्वप्नांना ? विसरलो आम्ही देशाच्या भवितव्याला ? अनेक प्रश्न उभे राहतात व प्रश्नांची उत्तरे हरवतात. जेव्हा आपले स्वप्न भंग होते, तेव्हा आपल्याला किती दुःख होते. पण जेव्हा डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांचे स्वप्न भंग झाले तेव्हा ? आजची तरुन पिढी कुठे हरवली आहे ? त्यांना भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांचे स्वप्न आठवणीतच नाहीये. २०२० संपले म्हणुन आम्ही फक्त २०२० मध्ये काय झाले, काय-काय घडले हेच पाहिले. संपुर्ण वर्षातील फक्त १ तास सुध्दा भारतरत्न डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नाबद्दल आजिबात विचार केला नाही, हा विचार मांडण्यात मला थोडासाही संकोच नाही. आजची तरुन पिढी त्या सार्वजनिक माध्यमांवरती हरवली आहे; टिक-टॅाक, पबजी सारख्या अनेक ॲप्स वरती गुंतली आहे. एखाद्या अभिनेता/अभिनेत्रीने काहीतरी सांगितले तर लगेच आजचा हा तरुन ते मान्य करतो व पुढे सांगतो. परंतु गेल्या ३४ वर्षांपासुन भारतरत्न डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम सर जे सांगत होते ते कोणत्या तरुणाने आचरणात आणले? त्याबद्दल आपल्या मित्रमैत्रीणिंना सांगितले ? ह्या सर्व बाबींवरुन एक गोष्ट लक्षात आली की आपली तरुण पिढी व्यसनाआहारी गेली आहे. ते व्यसनही कसले ते सांगण्याची काही गरज नाही. भारतरत्न डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम सर म्हणतात, स्वप्न असे पहा जे रात्रीची झोप उडवेल, व्यसन असे करा जे स्वप्न पुर्ण केल्याशिवाय उतरणार नाही. परंतु आम्ही काय केले हे सांगण्याची मुळीच गरज नाही.

अरे तरुण माणसा, ह्या देशाला आणि येणाऱ्या भविष्याला तुझी गरज आहे. तुझा एक-एक सेकंद मौल्यवान आहे. आजपर्यंत ह्या देशाने तुला किती तरी मदत केली आहे, आज हा देश तुझा वेळ मागत आहे तेही भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी. हो, माहिती आहे कि आपल्याला २०२० पर्यंत महासत्ताक होयचे होते; परंतु ती वेळ गेली येणारी वेळ तशीच आहे. आज मी, तु आणि अनेक देशांतील तरुण मिळुन एक निश्चय करूया २०२० नव्हे तर २०२५ पर्यंत माझा देश महासत्ताक झालाच पाहिजे. आपला मौल्यवान वेळ सोशल मिडीयावरती न घालविता, सोशल बुक वरती घालवू, ह्या देशाला आपली गरज आहे. निश्चय तर मी केलाच आहे व मी माझ्या निर्णयावर ठाम आहे; आता वेळ तुझी आहे व निर्णय सुद्धा तुझाच आहे. 

शेवटी मी एवढेच लिहीन,


हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, 

जरा से राहू द्या...!






लेखक – शिवम सत्यवान मद्रेवार.

Comments

  1. सत्य परिस्थिती सोप्या भाषेत परंतु मार्मिक पणे मांडली आहे. 😊❤

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम विचार

    ReplyDelete
  3. अतिशय उत्तम विचार

    ReplyDelete
  4. खूप सुंदर विचार!!👍👌 प्रत्येकाने विचार केला पाहिजे!! 🙌✨

    ReplyDelete
  5. नक्कीच सर.

    ReplyDelete

Post a Comment