ही वाट माझ्या स्वप्नांपासुन दुर जाते

उठल्याबरोबर सुत्रे खड्या आवाजात वाचावे,

तरी सुध्दा माझ्या आयुष्याचे गणित चुकावे,

रात्री डोळ्यातुन माझ्या गंगा वाहते,

अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दुर जाते.


अंकाने अंकानाच भागत बसावे,

पण दु:खाने आयुष्याला गुणावे,

वजाबाकीमध्ये माझे जीवन संपते,

अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासुन दुर जातें


अर्बट मामुचे संशोधन वाचावे,

न्युटनवरती आक्षेप मी घ्यावे,

पण माझ्या प्रकाशाला उंभराच अडवते,

अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.


प्रकाशाच्या तरंगाकडे आश्चर्याने पाहतो,

जगाला सापेक्षेतचा सिध्दांत मी समजावतो,

शेवटक्षणी वेळ येते व मला हरवते,

अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासुन दुर जाते.


लहानपणी प्रत्यक्षात सर्व ग्रह पाहिले,

तेव्हा पासून माझ्या स्वप्नांचे अवकाश लपले,

सुर्याचा तेज पाहुन आकाश अंधारते,

अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासुन दुर जाते.


पहिल्यांदा वाटच स्वप्न दाखवते,

तेच स्वप्न नंतर ती वाट रंगवते,

त्याच स्वप्नांची वाट वाट लावते,

अन् हीच वाट माझ्या स्नप्नांपासुन दुर जाते.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments