रात्र तारकांची

ताऱ्यां प्रमाने आकाशात तु सदैव दिसते,

चंद्राचा प्रकाश तुझ्या चेहऱ्याची शोभा वाढवते,

अमावस्या-पौर्णिमेचा खेळ माझ्या सोबत खेळते,

अन् रात्र तारकांची तुझीच आठवण करुन देते.


वर्षा ऋतुतील मोराप्रमाणे हर्षीत होते,

पिंपळाच्या झाडावरील कोकिळे प्रमाने गाते,

ह्या हसणाऱ्सा कवीला सुध्दा तु रडवते,

अन् ही रात्र तारंकांची तुझीच आठवण करुन देते.


पावसाळ्यात ढगांमागे लपुन बसते,

पाऊस उघडताच इंद्रधनु तु बनवते,

कधी-कधी माझ्यावरतीच कविता रचते,

अन् ही रात्र तारंकांची तुझीच आठवण करुन देते.


अचानकपणे शुक्रासारखे स्वप्नात येते,

डोळ्यांवरती पाणी शिंपडून स्वप्नभंग करते,

स्वत:च सौरमंडळाच्या कोपऱ्यात लपते,

अन् ही रात्र तारंकांची तुझीच आठवण करुन देते.


रात्रीच्या थंड वाऱ्यात तुच सगळीकडे वाहते,

स्वत: चंद्र तुझी वाटच सांगण्यासाठी येते,

तुला पाहताच माझे अस्थिर मन बावरते,

अन् ही रात्र तारंकांची तुझीच आठवण करुन देते.


सौर्यमालेच्या प्रत्येक ठिकाणातुन तु दिसते,

दिवसेंदिवस चंद्राप्रमाने तुझी शोभा वाढते,

काळोख्या अंधारात तुझा राग लपविते,

अन् ही रात्र तारंकांची तुझीच आठवण करुन देते.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments