अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.

सकाळी-सकाळी तुझ्या हातचा चहा मला लागतो,

तुला पाहताच मनातल्या मनात मी चारोळी रचतो,

तेवढ्यात मंद वाऱ्याची झुळूक वाहते,

अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.


गवताच्या पात्यावरती दवबिंदू खेळतो,

तुझ्या नथावरती मोत्यासारखा तो चमकतो,

अचानकपणे गुलाबी ठंडी पडते,

अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.


दुपारी डोक्यावरती सुर्य येतो,

माझ्यावरती प्रचंड तो तापतो,

तेवढ्यात तुझी सावली पडते,

अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.


फुलपाखरू संपुर्ण बाग पालथी घालतो,

शेवटी तुझ्यासारख्या पुष्पाजवळ थांबतो,

माझ्या कवितेत तेव्हा सायंकाळ होते,

अन् तुझ्या पासुन ही वाट दूर जाते.


पश्चिमेकडे सुर्य घरी परततो,

पुर्वेला शुक्राचा तारा चमकतो,

आकाशच तुझे चित्र रंगवते,

अन् तुझ्य पासुन ही वाट दूर जाते.


तुझ्या पासुन ही वाट दूर जाते,

जगाच्या कानाकोपऱ्याक लपते,

वेडे मन तुला कवितेत शोधते,

परंतु तु माझ्या ह्रदयात राहते!



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments