मागे वळून पाहताना.

लेखकही घाबरतो सत्य लिहीताना,

कवी रडतो निर्सगाची व्यथा सांगताना,

पुस्तके हरवतात माणसांना शोधताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


हस्ताचा आभाळ गरजतो जंगले जळताना,

मोरचे पाय थांबतात पाऊसात नाचताना,

पोपटाची जीभ कापते मिठू-मिठू बोलताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


शब्द तापतात अन्यायचे राज्य पाहताना,

वाक्यप्रचार पाहतात मर्यादा ओलांडताना,

तम जवळते असत्यला अलिंगन देताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


मुंगीही क्रोधित होते प्रयत्न अपयशताना,

वाघोबा नाराजतो शिकार सोडताना,

धरतीमाता शांत पाहते प्रदुषन होताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


दुःख होते नदीला शेतशिवार पाण्यात जाताना,

बैलही थकतो जुलूमाचे भार उचलताना,

भुमीसुध्दा रडते शेतकरी आत्महत्या करताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


मानव युध्द जिंकतो इतिहास घडवताना,

तलवारी आत्महत्या करतात रणांगण रंगवताना,

गंगे मध्ये डुबक्या मारतो स्वत:चे पाप धुवताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना.


रक्तबंबाळ होतात पाऊले ध्येयाकडे जाताना,

जगच विसरतात तारे प्रवास करताना,

सुर्यालाही ग्रहन लागते अंधार होताना,

अन् वेळही लाजते मागे वळून पाहताना. 




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. वळेपुठे मनुष्य हतबल होतो.पण या लेखात लेखकाने सर्व घटकांची व्यथा मांडली आहे जसे की आभाळ ,प्राणी, निसर्ग,भूमी ,युद्धच रणांगण, पाऊस,नदी

    ReplyDelete

Post a Comment