लहानपण दे रे देवा

किल्ला बांधायला मला लाल माती दे रे,

त्याच किल्ल्यांमधुन इतिहास दाखव रे,

छत्रपती शिवरायांचे विचार शिकव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


माझ्या आजीला लुकलुकत्या ताऱ्यांमध्ये दाखव रे,

अमावश्येच्या चंद्राला पुन्हा येण्यास सांग रे,

“सुर्याला रात्री कुठे लपतोस ?” विचार रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


सुरेश भटांचे कविता चालात गातो रे,

साने गुरूजींचे सुविचार दररोज वाचतो रे,

गणपती बाप्पांना सदैव नमन करतो रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


सकाळी-सकाळी गाईंचे दुध पाठव रे,

माझ्या मराठी मातीत मला खेळव रे,

सांयंकाळी आईच्या कुशीत झोपव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


लिहिण्यासाठी पाटी-पेन्सील दे  रे,

सरस्वती मातेचे मला दर्शन घडव रे,

विद्येच्या महासागरात मला बुडव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


माझ्या बाबांना खाऊ आणण्यास सांग रे,

“गल्लीतल्या दोस्तीला लपाछुपी खेळतो का ?” विचार रे

पण मला दररोज शाळेत पाठवू नको रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…


लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…

तहानलेल्या डोळ्यांमध्ये आनंद आण रे,

मंदिरातल्या दिव्याने सुध्दा वाट दाखव रे,

लहानपण दे रे देवा लहानपण दे रे…





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. कल्पना छान आहे.पण कटू सत्य हे ही की
    कधीही जुन्या आठवणीत जगता येत नाही.

    ReplyDelete

Post a Comment