आणि हातातील चहा थंड होतोय...

अवकाळी पाऊस शेतशिवार भिजवतोय,

आमच्या रानात उंच ऊस पिकतोय,

ढगांमागे लपलेला इंद्रधनु मला दिसतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


संगणकावरती बसुन डोक्याला ताण येतोय,

खुर्चीवर बसुन कामगार मान मोडतोय,

कार्यालयातून मला माझा बॅास पाहतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


रात्रीच्या काळोख्या आकाशात तो पाहतोय,

प्रेयसी सोबतच्या आठवणी चंद्र ताज्या करतोय,

हे सर्व काही निस्वार्थपणे प्रेमपत्र वाचतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


खुल्सा मैदानात घोडा गवत चरतोय,

हरिण मागे लागला म्हणुन कोल्हा रडतोय,

हे सर्व निमुटपणे डिस्कवरीचा कॅमेरा पाहतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


दिवस-रात्र विद्यार्थी अभ्यास करतोय,

एका रात्रीत संपुर्ण पुस्तक वाचतोय,

परीक्षेत मात्र चित्रपटातील गाणी लिहीतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


भिंतीवरील फळा तसाच लटकत राहतोय,

वैज्ञानिक संशोधन ओरडुन-ओरडुन सांगतोय,

नोबेल सारखे अनेक पुरस्कार तो हरतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


लेखक लेखणीने क्रोध व्यक्त करतोय,

न्यायाधिश महोदय खऱ्या पुराव्याची वाट पाहतोय,

जामीन वरती गुन्हेगार मात्र मुक्त संचार करतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...


जगाचे अनावर झालेले दुःख मानव ऐकतोय,

त्रस्त होऊन मावळत्या निर्संगाकडे इच्छा सांगतोय,

क्षणभरच त्या सर्व गोष्टींवरती चर्चा करतोय,

आणि हातातील चहा थंड होतोय...





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment