वेड्या मनाला कोठे शोधावे...

उगवत्या सुर्याकडे प्रसन्नतेने पहावे,

प्रकाशकिरणांसोबत डोंगदऱ्यात भटकावे,

जणू सुर्यदेवतासोबतच लपा-छुपी खेळावे,

आणि ह्या वेड्या मनाला निर्सगात शोधावे.


सुर्योदयापुर्वी त्या पक्ष्यांसोबत उठावे,

संपुर्ण आभाळ फिरुन पालथे घालावे,

सायंकाळी झाडांवरती किलबिलाट करावे,

आणि ह्या वेड्या मनाला पक्ष्यांमध्ये शोधावे.


रंगीबेरंगी फुलांसोबत होळी खेळावे,

जिथे जाईल तेथे सुगंधच पसरवावे,

फुलपाखरा सोबत बागेत हिंडावे,

आणि ह्या वेड्या मनाला फुलांमध्ये शोधावे.


गवताच्या पात्यावरती वाट पाहावे,

सुर्यप्रकाश येताच मोत्यासारखे चमकावे,

त्यानंतर मातीमध्ये जाऊन तृणाच्या कामी जावे,

आणि ह्या वेड्या मनाला दवबिंदूमध्ये शोधावे.


शेतकऱ्यासोबत पाऊसात कष्ट करावे,

आनंदी होऊन चिमण्यांसोबत माती उधळावे,

झाडाच्या बी-बियाणांना जीवनदान द्यावे,

आणि ह्या वेड्या मनाला मातीमध्ये शोधावे.


तापलेल्या भूमीला गारवा द्यावे,

अनेक प्रण्यांची तहान मिटवावे,

सगळीकडे हिरवळ पसरवून लपावे,

आणि ह्या वेड्या मनाला पाऊसात शोधावे.


हरल्यावरती मुंगीसारखे प्रयत्न करावे,

आपल्या ध्येया मागे चित्त्यासारखे धावावे,

गरुडासारखे उंच आकाशात झेप घेऊनच यावे,

आणि ह्या वेड्या मनाला ध्येयामागे शोधावे.


नभांसोबत दुःखी होऊन स्वत:चे रडावे,

समुद्राच्या त्सुनामी मध्ये राग व्यक्त करावे,

उन्हापाऊसात इंद्रधनु होऊन आनंद लिहावे,

आणि ह्या वेड्या मनाला भावनांमध्ये शोधावे.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments

Post a Comment