प्रेमाची परिभाषा

पहिल्या प्रहरापासुनच तिची सुरूवात होते,

घडाळाच्या काट्याप्रमाने ती नेहमी धावते,

काम करुनही कधीही पाहत नसते स्वःताची दशा,

अन् त्या मातोश्री चरणी शिकतो आम्ही प्रेमाची परिभाषा. 


शिवारातील तन उन्हातान्हात काढतो,

जगाचे पोट भरल्यानंतर तो झोपतो,

पाऊसाची वाट पाहत विसरतो निशा,

अन् त्या शेतकऱ्याकडुन शिकतो प्रेमाची परिभाषा.


माळरानावरील हिरवे गवत ती चरते,

सायंकाळी गोठ्यात आनंदाने हंबरते,

वासरांची असते दोन घोट दुधाची आशा,

अन् त्या गोमातेकडुन शिकतो आम्ही प्रेमाची परिभाषा. 


गोळ्या-बंदुकांचे युध्द शाईने मिटवतो,

येणाऱ्या पिढीला सत्यता समजावतो,

सर्व मानव जातील दाखवतो तो दिशा,

अन् त्या साहित्यकाराकडुन शिकतो प्रेमाची परिभाषा.


अनेक उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण करतो,

दुर्बिनीतुन दुरच्या ग्रहांकडे नवलाने पाहतो,

पृथ्वीवरील प्रदुषन संपविण्याची आहे त्याची आशा,

अन् त्या शास्त्रज्ञाकडून शिकतो आम्ही प्रेमाची परिभाषा. 


दिवस-रात्र पुस्तकांमध्ये डोके घालतो,

मोठ-मोठे गणिते सेकंदात सोडवतो,

अनिर्णित ध्येय गाठण्याची आहे त्याची नशा,

अन् त्या ध्येयवेड्याकडुन शिकतो आम्ही प्रेमाची परिभाषा.


रात्रीच्या चंद्र-ताऱ्यांकडे पाहुन विसरतो निशा,

सप्तरंगी इंद्रधनुची नसते कधी दिशा,

“झाडे लावा, झाडे जगवा” आहे अभिलाषा,

अन् त्या निसर्गसौंदर्याची शिकतो प्रेमाची परिभाषा.




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments