गुंजतो तुझा आवज दाटलेल्या नभा-नभात,
सांगतो तुझे उत्तर मला उंच आकाशात,
बरसतो शेवटी येऊन सखे अंगणात माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो आठवणी तुझ्या...
दिसतो सखे चेहरा तुझा पुस्तकांच्या पाना-पानात,
दरवळतो सौंदर्य तुझे रेखीव शब्दा-शब्दांत,
कविता रचतोय तो प्रत्येक श्वासातुन माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो आठवणी तुझ्या...
पसरवतो तुझ्या प्रेमाचे मनोहर रंग फुल-फुलात,
उधळतो सप्तरंग मनमोहक फुलपाखरात,
हिंडतोय मुक्त निर्सगात तो स्मरणात माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो आठवणी तुझ्या...
करतो दुरचा प्रवास तेजस्वी सुर्याच्या प्रकाशात,
चमकतो नाकातील नथ लटकलेल्या मोत्यात,
पसरवतो आनंदाचे दवबिंदू स्पर्शातून माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो आठवणी तुझ्या...
बरसतो रिमझिमपणे जसे घुंगरू पैंजणात,
खेळतो मुक्तपणे जसे फुलपाखरू फुलांत,
उगवतो सप्तरंगी इंद्रधनू हास्यातुन माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो आठवणी तुझ्या...
रंगवतो निसर्ग सांडून हर्ष तुझ्या चित्रचारोळ्यात,
भिजवतो रान सांजवेळी उभ्या तळ्या-मळ्यात,
मारतोय सडा मी प्रेमळ थेंबांचा लेखणीतून माझ्या,
अन् हा पाऊसमज सांगतो आठवणी तुझ्या...
रेखाटले सौंदर्य सखे तुझे कवितेतून माझ्या,
पडलो मोहात मी, पाहिले तु नजरेने तुझ्या,
काही थेंबही झाले बेधुंद आठवणींत माझ्या,
अन् हा पाऊस मज सांगतो सखे आठवणी तुझ्या...
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Nice
ReplyDeleteMast 🔥🔥
ReplyDelete👍
ReplyDeleteOne of the best poem🤩👌👌
ReplyDeleteछान ; सुंदर रचना!!👌✨
ReplyDelete