अन् कितीदा नव्याने तुला आठवावे...

अचानकपणे आभाळ दाटुन यावे,

भर ऊन्हाळ्यात गार पाऊसाने भिजावे,

त्यांच्यामधली संभाषण तुला सखे सांगावे,

अन् कितीदा नव्याने तुला आठवावे...


डोंगरदऱ्यांमागुन उगवणाऱ्या सुर्याकडे पहावे,

पाहटोच्या शांततेत तुझा चेहरा रेखाटावे,

तुझ्याकडे पाहता क्षणीच फुलपाखरूही लाजावे,

अन् कितीदा नव्याने तुला आठवावे...


सकाळी-सकाळी पक्ष्यांसोबत किलबिलाट करावे,

तुझ्या अंगणात येऊन गीत सादर करावे,

तुझ्या चेहऱ्यावरील फुल फुलवावे,

अन् कितीदा नव्याने तुला आठवावे...


सायंकाळी बागेत तु माझी वाट पहावे,

त्याच क्षणी मी तुझ्यासोबत लपंडाव खेळावे,

अचानकपणे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे उलगडावे,

अन् कितीदा तुला नव्याने आठवावे...


सुर्य मावळताना अवकाशात पहावे,

बेरंगी अशा अकाशात शब्दांची मैफिल भरवावे,

चंद्राचे सौंदर्य तुझ्या डोळ्यांत मला दिसावे।

अन् कितीदा तुला नव्याने मी आठवावे...


रात्रीच्या अंधारात ताऱ्यांसोबत अवकाशात वसावे,

आकाशगंगेच्या अंधारातही सौंदर्य पसरवावे,

समुद्रप्रवास करताना मला दिशा तुच दाखवावे,

अन् कितीदा तुला नव्याने मी आठवावे...


तुझ्याकडे पहावे, पहावे व पाहतच बसावे,

तुला पाहताना संपुर्ण जगच विसरावे,

निर्संगाच्या अनोख्या जगात दोघेच हरवावे,

अन् कितीदा तुला नव्याने आठवावे....




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment