ओंजळभर शब्द...

शांततेने भरलेले आकाश पाहतात,

पहाटेच पक्ष्यांसोबत सुर मिसळतात,

मंद वाऱ्यासोबत दऱ्यांमधुन वाहतात,

अन् ओंजळभर शब्द सकाळचे वर्णन करतात...


दाट धुक्यांमध्ये शेत-शिवारात सापडतात,

फिरुन-फिरुन तणाच्या पात्यावर येतात,

दवबिंदू होऊन त्या तणावरती चमकतात,

अन् ओंजळभर शब्द दवबिंदुचे वर्णन करतात...


दिवसभर आकाशात घिरक्या मारतात,

गव्हा-तांडळाचे दाने दुर वरुन आणतात,

झाडावरती वेगळीच काव्यसंमेलने भरवतात,

अन् ओंजळभर शब्द पक्ष्यांचे वर्णन करतात...


न्यायाधिशाकडे असतील तर न्याय देतात,

कवींकडे असतील तर काव्य रचतात,

विद्यार्थांकडे येऊन त्यांचे जीवन समृध्द करतात,

अन् ओंजळभर शब्द लेखणीचे वर्णन करतात..


न सुटणारे प्रश्न ते स्वत: शोधून सोडवतात,

दिवसरात्र मेहनत करुन त्याचे उत्तरे शोधतात,

शेवटी त्याच प्रश्नांमध्ये ते हरवूनच जातात,

अन् ओंजळभर शब्द त्या शास्त्रज्ञाचे वर्णन करतात...


आदिमानवाचा इतिहास जपुन ठेवतात,

येणाऱ्या पिढीला संस्कृती बद्दल सांगतात,

अज्ञानाचा विनाश करुन ज्ञानाची ज्योत पेटवतात,

अन् ओंजळभर शब्द त्या साहित्याचे वर्णन करतात...


निळ्या आकाशातही सागराबद्दल सांगतात,

जंगलामध्ये एक वेगळेच विश्व निर्माण करतात,

पृथ्वीवरचं स्वर्गाचे दर्शन आम्हास घडवतात,

अन् ओंजळभर शब्द निर्सगाचे वर्णन करतात...


ओंजळभर शब्द ज्वालामुखीसारखे तापतात,

ओंजळभर शब्द फुलांमध्ये सुगंध पसरवतात,

ओंजळभर शब्द चंद्रामधुन प्रेम व्यक्त करतात,

अन् ओंजळभर शब्द शब्दांचे वर्णन करतानाच अपुरे पडतात...






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments

Post a Comment