स्वप्न काय असावे ?

थोडेसे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलामांबद्दल : 


माजी राष्ट्रपती भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारांना प्रेरीत होऊन “स्वप्न काय असावे ?” ह्या प्रश्नाचे उत्तर कवितेच्या माधम्यातुन दिले! 

सर कलाम म्हणतात “स्वप्न, स्वप्न, स्वप्न ; स्वप्न विचारांमध्ये रुपांतरीत होतात आणि विचार कृती मध्ये !” त्यामुळे स्वप्न पहा, तसेच लहान स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे ! एकदा आपण आपल्या उद्देशांवर आणि आपण जी स्वप्न पाहिली ती प्रत्यक्षात उतरणारच या विश्वासावर ठाम श्रध्दा ठेवली की मग त्याच फळ आपल्या पदरात आपोआप पडायला सुरूवात होते. कोणत्याही नवनिर्मितीचा गाभा म्हणजे कल्पनाशक्ती ! जीवनामध्ये ठोस असं घडवणारी ही कल्पनाशक्ती ! आपल्याला जे मिळवण्यात ईच्छा आहे त्याकडे आपल्याला आकर्षित करुन घेण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्ये असते. पराभवाला विजयामध्ये बदलण्याची ताकद कल्पनाशक्तीमध्येच असते. विद्यार्थ्यांनी या देशाला ‘विकसीत देश’ म्हणुन पुढे आणण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे. मन प्रज्वलित करुन विचारांचा आवाका वाढवला पाहिजे. 

( माजी राष्ट्रपती भारतरत्न डॅा.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे अग्नीपंख, प्रज्वलित मने, माझ्या मनातील भारत, इंडिया २०२० अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास करुन काही महत्त्वाचे विचार वरती मांडले आहेत )

अशाच प्रकारे माझ्या मनात असलेल्या स्वप्नाची परिभाषा, सर कलामांनी लिहिलेली पुस्तके वाचल्यानंतर प्रकट झालेले विचार तसेच सर कलामांचे विचार ह्या कवितेतून उमललेले आहे.


कविता : स्वप्न काय असावे ?


जगभ्रमंती सेकंदात करावे व संकल्पना शोधावे,
त्या मौलिक संकल्पना सर्वांसमोर ठामपणे मांडावे,
इतरांपेक्षा वेगळेपण सिध्द करुन दाखवावे,
अन् हेच तर खऱ्या विद्यार्थ्याचे स्वप्न असावे !

जगभ्रमंती करत पुस्तकांच्या विश्वामघ्ये हरवावे,
कामामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येच्या मुळात जावे,
दारोदारी भटकण्याच्या ऐवजी स्वत:च उत्तर शोधावे,
अन् हेच तर खऱ्या संशोधकाचे स्वप्न असावे !

समस्येमुळे प्रश्नाचे उत्तर मिळताच विजय साजरा करावे,
खऱ्या विजयाचा आनंद शांततेतुन मिळवावे,
विजय मिळवुनही पुढच्या संधीची वाट पहावे,
अन् हेच तर खऱ्या यशाचे स्वप्न असावे !

जगातील पहिला शास्त्रज्ञ कोण ? म्हणुन प्रश्न विचारावे,
‘बालक’ हाच पहिला शास्त्रज्ञ हे त्याचे उत्तर असावे,
बालकाच्या मनातील प्रत्येक प्रश्न सोडवावे,
अन् हेच तर खऱ्या शास्त्रज्ञाचे स्वप्न असावे !

सदैव ग्रंथ-पुस्तकांच्या सानिध्यात वसावे,
वाक्यांच्या विळख्यात शब्द व शब्दांच्या विळख्यात म्हणी अडकावे,
लेखणीने संपुर्ण साहित्याचे व्यासपीठ रंगवावे,
अन् हेच तर खऱ्या साहित्यकाराचे स्वप्न असावे !

ज्वालामुखीच्या स्फोटांचे क्रोध व कडकडणाऱ्या ढगांचे दुःख अनुभवावे,
पक्ष्यांसोबत उंच भराऱ्या घेऊन संपुर्ण जग पहावे,
सप्तरंगी इंद्रधुचे रंग घेऊन निर्सगाचे सौंदर्य रेखाटावे,
अन् हेच तर खऱ्या चित्रकाराचे स्वप्न असावे !

हजारो क्षेपणास्त्र, अवणास्त्र तयार करावे,
त्याच्या चाचण्या सुध्दा यशस्वी व्हावे,
तरी सुध्दा लेखणीनेच सर्व युध्ये जिंकावे,
अन् हेच तर खऱ्या लढाईंचे  स्वप्न असावे !

अपयशाचे आव्हान अधिक उत्साहाने स्विकारावे,
येणाऱ्या संधीची चातकाप्रमाने वाट पहावे,
स्वत:चे असीम धैर्य पुर्णपणे झोकुन पुर्णत्वाला न्यावे,
अन् हेच तर खऱ्या प्रश्नाचे  स्वप्न असावे !

गरिबीमध्ये सुखी व दुःखामघ्ये आनंदी रहावे,
जिवघेण्या शत्रुला सुध्दा आपले मित्र मानावे,
नदीचे औदार्य व सुर्याची परोपकारी वृत्ती धारण करावे,
अन् हेच तर खऱ्या सत्वपुरुषाचे स्वप्न असावे ! 

स्वप्न विचांरामध्ये रुपांतरीत व्हावे,
विचारांचे परिर्वतन होऊन, विचार कृतीमध्ये बदलावे;
कृतीमधुन नवनविन शोधावे व शोधत रहावे,
अन् हेच तर खऱ्या स्वप्नाचे  स्वप्न असावे ! 

विभाजन करणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करावे,
संचित विचारांची प्रत्येक तरुणाने कास धरावे,
डॅा.ए.पी.जे अब्दुल कलामांचे स्वप्न प्रत्यक्षात रंगवावे,
अन् हेच तर खऱ्या तरुणाचे स्वप्न असावे !



टिप : सर कलामांच्या पुस्तकांमधील काही वाक्ये थोडेसे बदल करुन कवितेमध्ये त्यांचा प्रयोग केला आहे. 


कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.








Comments

  1. खूप भारी लिखाण केले 👌👌🔥

    ReplyDelete
  2. नक्कीच!सध्याच्या युवकांनी आपला देश विकसित कसा होईल आणि आपली जी काही स्वप्ने असतील ते देशाच्या हितासाठी कसे उपयोजता येतील याकडे नक्कीच लक्ष्य देण्याची पुरेपूर गरज आहे.
    हा लेख नक्कीच त्या सर्व युवाना प्रत्येकाला देशासाठी प्रेरित करणारा आहे खूप छान लेख.

    ReplyDelete
  3. हा लेख आणि सोबतीला कविता नक्कीच प्रत्येकाला प्रेरित करणारी आहे खूप छान लेख 👌👌

    ReplyDelete
  4. In your hand there is something different magic.Keep it,with writing such awesome poems.
    All the best.

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर कविता आहे ❣️.जे कोणी देशासाठी काहीतरी करू इच्छिते त्यांकर्ता हे सुंदर विचार आहेत ����.........

    ReplyDelete
  6. Little poet very nice poem . Good meaningful words .Go ahead.

    ReplyDelete
  7. Superb beta !! How nicely you compose this poem . Good, collection of selective words !! Good keep it up !

    ReplyDelete
  8. Superb beta !! How nicely you compose this poem. Good, collection of selective words!! Keep it up!!

    ReplyDelete

Post a Comment