एक नवे संकट - आत्महत्या

आत्महत्या ! 


काय आहे ही आत्महत्या ?


स्व:इच्छेने स्वत:चे मौल्यवान आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या; संकटांना सामोरे न जाता, संकटांपासुन पळ काढणे म्हणजे आत्महत्या; दिर्घकालीन विचार न करता, थोड्याच कालावधी पुरताच विचार करणे म्हणजे आत्महत्या; आत्महत्या हाच एक शेवटचा मार्ग ?


( लेख मोठा वाटेल पण तुमचे विचार नक्की बदलेल, तुमच्या जीवनासाठी हा लेख संपुर्ण वाचा ) 


          जागतिक आरोग्य संघटना, विकिपीडीया व काही लेख यांचा अभ्यास केला. लोक आत्महत्या का करतात ? जेव्हा एखाद्या व्यक्तींचा स्वत:चे जीवन निरर्थक वाटू लागते तसेच वेळोवेळी एकटे राहिल्या मुळे मानसिक पाठबळाचा अभाव निर्माण झाल्यामुळे तो व्यक्ती स्वत:चे जीवन संपविण्याचा प्रयत्न करतो. आत्महत्या करताना एखादा व्यक्ती कित्येकवेळा विचार करतो, रडतो, पण एकही मार्ग न सापडल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करतो; अनेक प्रयत्न अपयशी ठरतात पण जर एखादी गोष्ट ह्रदयात टोचली असेल तर तो प्रयत्न सोडत नाही. अखेर म्हटले जाते ना ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’; तोच नैराश्यतेचा, अपयशाचा काळ त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडतो. 


आत्महत्या कोण करतात ? त्याची कारणे कोणती ?

1. वयक्तीक नातेसंबंधामधीस गुंते :

          आम्ही केलेल्या अभ्यासानुसार जगातील सर्वात जास्त आत्महत्या ही वयक्तीक नातेसंबंध बिघडल्यामुळे होतात. त्यामध्ये पती-पत्नी असो किंवा वडिल-सुपुत्राचे, आपापसातील कमी होणारे संवाद, वाढते द्वेश व निर्माण होणारे गैरसमज त्यामुळे मोठ्याप्रमानावरती वाद होतोत व नात्यामघ्ये फुट पडण्यास सुरूवात होते. कालांतराने तो/ती व्यक्ती नैराश्यतेमधुन वाहते व स्वत:ला सावरु न शकल्यामुळे आत्महत्या करते. ह्यावर उपाय म्हणजे एकमेकांमधील द्वेश, क्रोध शांततेने संवादामधुन मिटवणे व एकोप्याने राहणे. 


2. आर्थिक संकटे :

          आत्महत्येचे दुसरे कारण म्हणजे आर्थिक संकटे. मी अनेक लोक पाहिले, खुप मोठ्य प्रमानावरती कर्ज घेतात व फेडु नशकल्यामुळे किंवा हफ्ते देण्यात विलंब झाल्यामुळे शेवटचा मार्ग म्हणुन आत्महत्या करतात. खुप लोक कर्ज घेतात व ते वेळेवर परतही करतात पण जुलमी सावकार, बॅंकेचे वाढत जाणारे व्याज व चक्रवादी व्याज ह्या सर्व कारणांमुळे तो व्यक्ती आत्महत्या करतो.  आर्थिक संकटांमुळे होणाऱ्या अनेक आत्महत्या आपण सर्व कर्जदारांना आर्थिक ज्ञान देऊन येणार संकटे त्यांच्यावरील टाळून असे आत्महत्या कमी करु शकतो !


3. महत्त्वाचे - विद्यार्थी.

           तसं पहायला गेले तर दरवर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी मोठा भाग हा विद्यार्थ्यांचा असतो. त्यामागे तीन कारणे आहेत. एक सतत मिळणारे अपयश, दोन सार्वजणीक माध्यमांचा ताण आणि तीन म्हणजे दिवसेंदिवस कमी होत जाणारा संवाद ! आपल्या शैक्षणीक दृष्टीकोणातुन पाहिले तर एखाद्या विद्यार्थ्याची गुणवत्ता ही गुणांवरती ठरवली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये लपलेल्या गुणांवर वाव मिळत नाही. त्यामुळे सातत्याने अपशाच्या पयऱ्या त्याला चढाव्या लागतात व एक दिवस तो आत्महत्येची पायरी चढतो. सार्वजणीक माध्यमांचा त्याच्यावरती कळत न-कळत ताण पडतो, टिक-टॅाक व पबजी सारखे ॲप बंद केल्यामुळे मानसिक ताण वाढतो व मानसिक ताण हद्द पार झाल्यावर टोकाचे पाऊस उचलतो. दिवसेंदिवस विद्यार्थी व पालक यांच्यामधील कमी होत जाणारा संवाद देखील येणाऱ्या पीढिला घातक ठरतोय, कमी होत जाणारा संवाद, नाहीसा होणारा स्वत:वरील आत्मविश्वास व स्वत:बद्दल वाढत जाणारा द्वेश हा तरुन/तरुणी म्हणजेच विद्यार्थी दशेत असणाऱ्याचे मुख्य आत्महत्येचे कारण ठरतात. अंतर्भूत कलागुणांना वाव देणे, विद्यार्थी-पालक, मित्र-मैत्रीणींमधील संवाद वाढवणे तसेच व्यायाम यामुळे तरुणांमधीस आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. 


          जागतिक अरोग्य संघटनेच्या माहिती नुसार दरवर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्येचे बळी ठरतात. माझा त्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न आहे, आत्महत्या करुन तुम्हाला काय मिळाले ? दुरावलेले नाते ते जवळीक झाले ? सर्व आर्थिक समस्या सुटल्या ? परीक्षेत चांगले गुण मिळाले ? का संकटे सदैव मिटली ? एक गोष्ट लक्षात ठेवा वाचकांनो, आत्महत्या हा शेवटचा मार्ग नाही ना ही त्यामुळे सर्व संकटे मिटणार आहेत उलट संकटांमध्ये वाढ होईल आपले जवळच्याच व्यक्तींना त्याचा त्रास सहण करावा लागेल. 



सुसंवाद वाढवा;

आत्महत्या टाळा !





एक कविता :

आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?



व्यासपीठावर एकापेक्षा एक खेळ दाखवले,

पोट दुखेपर्यंत समोरच्या प्रेक्षकांना हसवले,

स्वत:चे दुःख मात्र सर्वांपासुन तु लपवले,

अरे विदुषका, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


चंद्र-ताऱ्यांमधील सौदर्यं तु तीच्यात पाहिले,

कवीपेक्षा अप्रतिम वर्णन तु तीचे शब्दांमध्ये केले,

ती सोडुन गेली म्हणुन विश्व तुझे हरपले ?

अरे प्रेमवेढ्या, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


हजारो सिध्दांतावरती आक्षेप घेऊन पुरावे दिले,

नविन सिध्दांत मांडुन अनोखे विज्ञान रचले,

नोबेलच्या यादीमध्ये तुझे नाव प्रकाशित झाले,

अरे संशोधका, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


दिवस-रात्र जागून तु संपुर्ण पुस्तक अभ्यासले,

गणित-विज्ञानाचा सराव करुन पाठ्यपुस्तके भरवले,

छोट्याश्या कारणांवरून निकालात कमी गुण मिळाले,

अरे विद्यार्थ्या, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


अनेक ग्रंथ-पुस्ककांचे ज्ञान तु ग्रहण केले,

उघड्या डोळ्यांनी ध्येय तु निर्माण केले,

सातत्याच्या अपयशामुळे तुझे धैर्य खचले,

अरे ध्येयवेढ्या, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


उन्हा-पाऊसात काळ्यामातीला त्याने कसले,

गोठ्यातील मुक्यांना मुलाबाळांप्रमाने जपले,

संकटकाळी अर्थव्यवस्थेच्या कणाला सर्वलोक विसरले,

अरे जगाच्या पोशिंद्या, आत्महत्या करुन काय रे तुला मिळाले ?


जीवनाच्या खडतर वाटेवर चालताना अनेकांना अपयश आले,

कोण अपयश पचवले तर कोण त्यात जखमी झाले,

समोरुन अपयशाच्या लाटा तर वरुन दुःखांचा वर्षाव बरसले,

मित्र-मैत्रीणी असुनही तु आत्महत्येचा विचार मनात का आणले ?


कोणाचे नाते विटले तर कोणाचे स्वप्न मिटले,

जीवनाच्या खडतर वाटेवर ते एकटे पडले,

धाडस करुन मी आत्महत्येच्या आत्म्यास विचारले,

का रे, तुला हे सर्व थांबवितां नाही आले ?







कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

  1. छन!! 👍 कविता खूप छान लिहिलीय!!👌👌

    ReplyDelete
  2. खुपचं छान लिहलयं , संपुर्ण माहिती सोबतचं आत्महत्त्मययेच्या कारण, तणाव व्यवस्थापन त्यात सांगितले,
    आणि मुख्य कविता फारचं खोल अर्थ दळवळलेला😍😘...
    खूप खूप आनंद झाला, तुमचा सुरेख असा लेख वाचायला मिळाला ,
    तुमच्या पुढच्या प्रवासा करिता खूप खुप शुभेच्छा ,
    फारचं छान दादा

    ReplyDelete
  3. Ekdam best 👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  4. Very nice as well as true. 👍👌

    ReplyDelete
  5. Khup sunder 😍😍🤗

    ReplyDelete
  6. Mast lihili dear 😍😍

    ReplyDelete
  7. उत्तम लेख लिहला आहेस तू❣️❣️संपूर्ण लेखंनात उत्तम सार तुम्ही व्यक्त केला🙂

    ReplyDelete
  8. One of the best poem shivam 👍
    Well done
    Keep it up 👏👏

    ReplyDelete
  9. Very nice Shivam 👌👌🔥
    All the best for further poems👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment