होळीचे रंग सारे
ओल्याचिंब थेंबाने सारे रान भिजवले,
बीजांमधुन तृणाने डोकावून त्याने पाहिले,
शेतकऱ्यासोबत शिवारामध्ये रंग सुध्दा राबले,
अन् होळीचे रंग सारे काळ्या मातीत पसरले !
चंद्राचा उदय व सुर्यास्ताने आकाश जांभळे झाले,
पोपट-बगळ्यांच्या पिसांनी संपुर्ण अंबर रंगले,
चांदण्यांनी मात्र गगन काळे-निळेच झाले,
अन् होळीचे रंग सारे निळ्या आकाशात पसरले !
कोठे पिवळी पाने तर कोठे लाल फुलांचा सडा मारले,
तृणाच्या पात्यावर दवबिंदू मोत्याप्रमाने चमकले,
पावसाळ्यात संपुर्ण जगच अनुरागाने न्याहुन काढले,
अन् होळीचे रंग सारे हिरव्या निर्सगात पसरले !
वीजांच्या कडकडाटेने आकाशात काळोख पसरले,
खेंब बरसले व सातही रंग एकाच कारागृहात अडकले,
पाऊसाचे व सुर्यप्रकाशाचे अचानकपणे मिलन झाले,
अन् होळीचे रंग सारे सप्तरंगी इंद्रधनुत पसरले !
प्रियकराने कवितेमधुन तिचे कौतुक रचले,
प्रेमपत्र चंद्राच्या साक्षीने तीला चांदण्यांमध्ये पाठवले,
प्रेमाच्या बोलाने चंद्रही आठवणीत गालातच लाजले,
अन् होळीचे रंग सारे शुभ्र सुधाकरात पसरले !
पुस्तकांच्या पृष्ठावर सर्वच रंगांनी भाग घेतले,
आतल्या भागांत काळ्यारंगानेच भावना सहभाग झाले,
प्रत्यक्षात मात्र साहित्यकारांनी लेखणीतून ज्ञान पसरवले,
अन् होळीचे रंग सारे निळ्या शाईतुन पसरले !
निर्सगातील अनेक आश्चर्यांने सर्व सण झाले बेधुंद,
सप्तरंगी इंद्रधनुने मध्ये येऊन आश्चर्य केले भंग,
मात्र कवितेमधील वर्णनाने रंगच झाले गुंग,
अन् होळीतल्या रंगांना पाहुन बेरंग झाले रंग !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Bharich 🔥🔥🙌✍️
ReplyDeleteNice👌👍
ReplyDeleteMast
ReplyDeleteMast bahu
ReplyDeleteRadach
ReplyDeleteSuper
ReplyDeleteKhup chhan kavita..keep it up 👌👌👍
ReplyDelete❣️❣️❣️❣️
ReplyDeleteKadak
ReplyDeleteVery nice . Good vocabulary.
ReplyDeleteClassss
ReplyDelete