नशिबाने मूर्ख बनवले...

नशिबाने मूर्ख बनवले...



प्रचंड उष्ण तापमानात ढग निर्माण झाले,

मोसमी वाऱ्याने त्यांना जागेवरती पोहचवले,

पण मानवाने कृत्रिम रित्या पाऊस पाडले,

आणि ढगांना नशिबानेच मूर्ख बनवले...


जगवण्यासाठी सृष्टीने झाडांची निर्मीती केले,

त्या झाडांमुळे मानवाचे घरदार तयार झाले,

बोन्साय पध्दतीमुळे कुंडीमध्ये झाड आखडले,

आणि झाडांना नशिबाने मूर्ख बनवले...


हिमालयात तपश्चर्या करुन प्रवास सुरू केले,

उत्तरेपासुन दक्षिणेपर्यंत हिरवळ पसरवून सुजलाम-सुफलाम केले,

मात्र समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन पिण्यायोग्य बनवले,

आणि सरीतेला नशिबानेच मूर्ख  बनवले...


वेळ वाचवण्यासाठी  काळ बदलण्यासाठी टाईम मशिन बनवले,

मशिन बनवता-बनवता मौल्यवान वेळ मात्र संपवले,

त्यानंतर वेळेची किंमत पैसासोबत गणले,

आणि वेळेलाच नशिबाने मूर्ख बनवले...


लहाणपणी लेखणी हातात धरुन लिहिण्यास शिकवले,

त्याच लेखणीने संपूर्ण जगाला तु जिंकले,

आता मात्र संगणकावरती टाईप करुन पाठवले,

आणि लेखणीलाच नशिबानेच मूर्ख  बनवले...


आजोबांची आठवण आली म्हणून पत्र पोष्टात टाकले,

पहिल्या पत्रात आईबद्दल खुप कौतुकाने सांगितले,

ईमेल द्वारेच आता सर्व नाते एका क्लिकवर आणले,

आणि पत्रांनाच नशिबाने मूर्ख बनवले...


ज्ञान ग्रहण करुन विचारांना प्रोत्साहित केले,

विचारांमुळेच अशक्य ध्येयाची वाट चालले,

त्याच विचारांना कृत्रीम मानवात परार्वर्तित केले,

आणि विचारांनाच नशिबाने मूर्ख बनवले..


वेळ वाचवण्यासाठी गाड्यांचा भरमसाठ वापर केले,

सोने शोधाताशोधता हिरवळीला कायमचे गमवले,

अनेक शौर्य गाजवूनही ‘विद्रोही’ म्हणून नाव कमवले,

आणि निर्सगाने मानवालाच मूर्ख बनवले...






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. He khara aahe ki manus ya jagat kasahacha hi malaka nahi tycha javal je kahi aahe te nisarganecha tyla dile aahe aani nisarga sagala parat hi ghe u shakati

    Khup chan kawita aahe
    yewadha motha satya tumhi tumacha javite dware sarvan samor masala aahe

    ReplyDelete
  2. खप आवडले शब्द रचना मर्मावर बोट ठेवणारी आहे.

    ReplyDelete
  3. खुप भारी 👌👌
    प्रत्येक शब्दाची सांगड घालत असताना परिस्थिती अचूक टिपलीय 🔥सुंदर

    ReplyDelete

Post a Comment