शब्दच कुढे उरतात...

 शब्दच कुढे उरतात...



अधिकारी लोक गोरगरीबांकडून लाच घेतात,

सर्वसामान्य मानसाचे हाल बेहाल करून सोडतात,

प्रत्येक परिस्थितीवरती लेखकच भाष्य करतात,

भ्रष्टाचार पाहताना शब्दच कुठे उरतात...


दिवसभर कामामध्येच ते तल्लीन असतात,

अगदी शुल्लक कारणांवरून कोर्टात ओढले जातात,

न्यायाची वाट पाहताना लोकांची आयुष्य संपतात,

जुलमी अन्याय पाहताना शब्दच कुठे उरतात...


सर्व काही माहिती असुनही आवाज मिटवतात,

अन्यायही तोंडावर बोट ठेऊनच निमुटपणे पाहतात,

जगासमोर सत्य मांडताना पुरावेच नष्ट केले जातात,

विद्रोही असत्य ऐकताना शब्दच कुठे उरतात...


लिहीताना लेखक साहित्यविश्वात रमतात,

कागदांवरती कागदे निळ्या-काळ्या शाईने रंगवतात,

काय माहिती पण दुरध्वनीच्या जगात वाचकच हरवतात,

दुरध्वनीतल्या विश्वाकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


ग्रंथ-पुस्तकांमध्ये अनन्यसाधारण विचार खेळतात,

परंतु ग्रंथालय हा शब्द श्बदकोशातुन मिटवतात,

कागदावरील शाईने लिहीलेले शब्द खोडले जातात,

शांत बसलेल्या साहित्याकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


आजीला पत्र आजचे युवा ईमेलने पाठवतात,

त्यामुळे आजकाल पोष्टांचे टिकीटे आत्महत्या करतात,

उद्याची परिस्थिती पाहताना लेखण्या संपावर जातात,

आटलेल्या शाईकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


तप्त उन्हाने तलाव-सरोवरे सर्वकाही आटून जातात,

नद्यांच्या पात्रांसोबत जंगले सुध्दा ओसाड पडतात,

या सर्वांमध्ये पशु-वनस्पती मृत्युला सामोरे जातात,

पडलेल्या दुष्काळाकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


आकाशात जाण्यासाठी झाडांच्या शर्यती लागतात,

एकोप्याने सर्व प्राणी हिरवळीमागे लपंडाव खेळतात,

तप्त अशा उन्हामुळे झाडांवरती झांडे घासून पेट घेतात,

जंगलातील वणव्याकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


निर्सगाचे दुःख सांगताना विजा कडकडतात,

डोळ्यांमधुन अश्रू वाहिल्यासारखे नभ बरसतात,

ह्रदयातले भावनांची धरणे अक्षरक्षतुटून पडतात,

पसरलेल्या महापुराकडे पाहताना शब्दच कुठे उरतात...


असत्यअन्यायाने भरलेले घोर कलियुग शब्द सोसतात,

चेहऱ्यामागे चेहरे बदलतात पण शब्द तसेच पाहतात,

न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे शब्द व्यासपीठामागेच लपतात,

शांत बसलेल्या शब्दांकडे पाहताना शब्दच कुठे उरतात....






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

Post a Comment