खरंच, प्रत्येक पानावर स्वप्न लिहीली आहेत !

खरंचप्रत्येक पानावर स्वप्न लिहीली आहेत !





शिवारात पिकलेले ज्वारी टोकदार चोचीने वेचतात,

पंखांच्या सहाय्याने खोडकर नभाला बोलून येतात,

साहित्याच्या जगात विहंगाचे वेगळेच खंड आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


फुलांवरती बसुन सकाळच बहरून टाकतात,

धरतीमातेची शोभा ते वेगवेगळ्या रंगांनी भरतात,

पुस्तकांमध्ये इंद्रधनुष्य म्हणुन फुलपाखरांना संबोधले आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


हिवाळ्यात गुलाबी ठंडीला आमंत्रित करतात,

साध्या असा गवताच्या पात्याचे सौंदर्य वाढवतात,

प्रत्येक ओळी-ओळींमध्ये दवबिंदू चमकले आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


समुद्रकिणारी सरळ तर डोंगरमाथ्यावर नागमोडी असतात,

जीवनाची वाट चुकलेल्याला आशेची वाट दाखवितात,

तसे पाहता वाट सुध्दा पुस्तकातील पात्रे आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


दुरवरचा प्रवास साकारून येतात  प्रत्येकाला जीवनदान देतात,

भेदभाव मिटवण्याचे जीवंत उदाहरणे शिकवतात,

सगळ्याच पुस्तकांमध्ये त्यांचे वर्णन लेखकाने केले आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


सुर्य असो वा चंद्रकाळ्या नभांसोबतही मैत्री करतात,

पक्षीसुध्दा घरच्या वाटा त्यांनाच विचारतात,

अनेक स्वप्नांच्या वाटा त्यांच्या थेंबांनी दाखविले आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


निसर्गात आल्यावर सर्व शब्द ओळखीचे वाटतात,

अनोळखी अनुभव विस्तृत पणे समजाऊन सांगतात,

पुस्तकांमध्येही स्वप्ने त्या शब्दांमध्ये लपली आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


क्षणोक्षणी त्यांची किंमत सर्वच मोजतात,

ध्येयवेडे सर्वश्रेष्ठ गुरू म्हणुन त्यास पुजतात,

वेळेमुळेच साहित्य विचार जीवंतपणे मांडत आहेत,

खरंचप्रत्येक पानावर स्वप्ने लिहीले आहेत !


स्वप्नस्वप्नस्वप्नस्वप्न काय असतात,

रात्रीची झोप उडवून डोळ्यांसमोर चित्र रंगवतात,

तसे पाहताडॅा.कलाम स्वप्नवेड्याचे मार्गदर्शक आहेत,

बदलणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या पानावरती स्वप्ने लिहीली आहेत...!



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments

  1. खरंच, प्रत्येक पानावर स्वप्न लिहीली आहेत !❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  2. अप्रतिम✌👍👌

    ReplyDelete
  3. खुप सुंदर रेखाटले 👌🏻👌🏻🔥
    उत्कृष्ट लिहिले 🔥🔥

    ReplyDelete
  4. Khखूप छान 👌👏👏

    ReplyDelete
  5. खूप छान 👌👏👏

    ReplyDelete
  6. Abhi Deshmukh-DesaiMay 3, 2021 at 12:54 PM

    Kdkkk re bhau___❤💥

    ReplyDelete
  7. खुप सुंदर कविता

    ReplyDelete
  8. स्वप्नांची कविता मस्त लिहीली

    ReplyDelete
  9. Best poem ever

    ReplyDelete
  10. अप्रतिम ❤️📚🙌

    ReplyDelete
  11. 👌👌❤️✍️

    ReplyDelete
  12. Superb shivam 👌👌

    ReplyDelete
  13. Mast lihile

    ReplyDelete
  14. Sakshi Mahadik-PatilMay 4, 2021 at 9:53 AM

    छान आहे

    ReplyDelete

Post a Comment