ते पाच रुपये…

बालपणप्रत्येकाचा जीवनातील अनमोल असा तो काळ असतोचकोण त्या काळात भरघोस आनंद लुटतोकोण मातीत खेळतोकोण देवबप्पाजवळ जाऊन भक्ती करतोकोण आईचा सदैव मार खात असतो त्यानंतरएखादा आमच्या सारखा येतो गप्प बसुन कट-कारस्थान रचणारातसे पाहता प्रत्येकाचे बालपण खुप वेगळे असतेकोणाच्याही बालपणात साम्य आढळणारच नाही आणि आढळलेच तर तो निव्वळ दैवी प्रकोप मानावाहोएक गोष्ट अशी जी बालपणामघ्ये प्रत्येकाच्या साम्य वाटतेशाळेत जायचे नसेलशाळेतून लवकर घरीयायचे असेलगृहपाठ पुर्ण झाला नसेल तर हुषार पासुन मठ्ठ मुलाचेसुध्दा एकच कारण असते पोटात दुखतंय?” हे कारण सांगितले की मोठ्यात मोठी शिक्षा सुध्दा माफ होत असेपण मला आज पर्यंत समजले नाही की, का कॅालेजच्या ॲानलाईन क्लासेस मध्ये सुध्दा माझे कधी कधी पोट दुखते



बालपणामध्ये अशा अनेक गोष्टी होत्या की त्या म्हाताऱ्यांना सुध्दा ताजे-तवाने वाटतात आणि कधी-कधी तर अंगणवाडीच्या बागेत जाऊन झोका खेळतातमहाविद्यालयातील विद्यार्थी सुध्दा त्या अंगणवाडीतील मुलांनादिले जाणारे उकडलेली कडधान्ये असे मागून खातात जसे एक लहान मुल हट्ट करतेआजही एखादे पुस्तकहातात आले की त्यातील सारांश  वाचतां पहिला चित्रे पाहतोहा सुध्दा एक प्रकारे लहाणपणच आहेपरंतु दुर्देव असे कि कित्येक मुले अशी आहेत ज्यांना त्यांच्या हक्काचे बालपण सुध्दा अनुभवता येत नाहीअशा मुलांकडे पाहुन आजही दुःख होतेबालपणातील सर्वांत त्रास देणारे तसेच मौजमस्ती घडवणारे एकच ठिकाण असायचे ते म्हणजे शाळाशाळेत जात असताना अनेक गोष्टींचा आम्ही हट्ट धरत होतोपेनपेन्सीलदप्तरवहीपुस्तकइत्यादीइत्यादी त्यांची यादी करायला गेलो तर वेळ पुरणार नाही इतक्या त्या वस्तु असतात



एक गोष्ट अशी होती त्याचा हट्ट आम्ही दररोज करत होतो पण आठवड्याला नव्हेच नव्हे तर पंधरवड्याला ती मिळत होतीती गोष्ट म्हणजे आईने हातात दिलेले पन्नास पैस्याचे नाणेते एक साम्य असे होते ज्याचा मी नव्हेतर प्रत्येक जण आईजवळ शाळेत जाताना रडुन-रडुन हट्ट करत होताकदाचित हे एक पोटदुखीचे कारण असावेअसो पण जेव्हा ते नाणे मिळते तेव्हा डॅाक्टरच्या पोट दुखीची गरज भासत नाहीत्यामध्ये परत शाळेत आल्यावर चढाओढमाझ्याकडे पंचवीस पैसेमाझ्याकडे पन्नास पैसेमाझ्याकडे एक रुपयाज्याच्याकडे सगळ्यात जास्त पैसे तो सर्वांत श्रीमंत मानला जात होता ते ही एक दिवसापुरताचपहिलीत असताना सुध्दा आम्ही एक रुपया मागत होतोआठवीत असताना सुध्दा एक रूपयाच मागत होतोकधी एक रुपया मिळत होताकधी दोन रुपये तर कधी पाच रुपयेपरंतु जे काही मिळत होते त्यामध्ये क्षणीक आनंद असायचा तो त्या बालपणात आम्ही आनंदात होतोदर वेळी आम्ही आई कडुनच पैसे मागत होतोकधी तर वडिलांना मागतहोतोफरक एवढाच की आई कडुन लहान रुपया मिळत असे  वडिलांकडून मोठा रुपया !



वडिलांकडून जेव्हाही पाच रुपये मिळत होते तेव्हा खर्च कोठे करावे हे समजत नव्हतेकारण आकडा मोठा असायचा आणि विकत घेणाऱ्या वस्तु भरपूरकाल पाच रुपये मिळाले त्यातील सुध्दा रुपये शिल्लक राहतहोतेआज शुन्य वाढुन पाचशे रुपये झाले तरी सुध्दा अनेक पैसे उरतातआणि उद्या पन्नास हजार जरी झालेतरी सुध्दा पैशासोबत अनेक गोष्टी शिल्लक राहणार आहेतवडिल जे काही देतात गरजा पुर्ण होऊन उरेल इतके देतातत्यांच्याकडुन मिळणारे प्रेम असो वा पैसास्वत:च्या गरजा बाजुला ठेऊन आपल्या गरजा पुर्ण करणारे आहेत ते वडिलदाढी करताताना शेव्हिंगची क्रीम संपली तर साबन वापरतातनिकाल आपला लागतो व बाप गुपचुप पणे पेढे आनुन आनंद साजरा करतोजगातील सर्वांत श्रेष्ठ नाते हे बाप-लेकीचे असतेदोघांमध्ये खुप बोलणे होतेमौजमजा घडतातबाप-लेकी सोबतचे ते क्षण कॅमेऱ्यात कैद करुन पुन्हा पुन्हा जीवना मध्ये रिप्ले करावेसे वाटतात. प्रत्येक मुलीला देवाने दिलेली भेट म्हणजेच ‘बाबा’. परंतु मुलांच्याबाबतीत असे नसते



थोड्याश्या कारणांवरून एकमेकांमध्ये वाद निर्माण केले,

अतोनात प्रेम असुनही उश्यांमागेच सर्व अश्रू वाहिले,

आयुष्यभर एकमेकांसोबत काहीच शब्द  बोलले

बापाच्या अन् मुलाच्या नात्या मध्ये शब्द का मुके झाले ?



मी लिहिलेल्या ह्या चारोळी प्रमाने क्षुल्लक कारणावरून बापा  मुलाच्या नात्यात खुप मतभेद निर्माण होताततो बाप स्वतदिवाळीला नविन कपडे  घेता मुलाला नविन कपडे घेतोस्वतपायी कामावर जातो परंतु मुलाला दुचाकी घेऊन कॅालेजला पाठवतोएखाद्या दिवशी स्वतएक चपाती कमी जेवतो पण मुलाचे पोटभरतोपण का रे विधात्या थोड्याश्या शब्दांमुळे बापामध्ये अन् मुलामघ्ये मत भेद वाढतात ?



मध्यस्थी व्हेंटीलेटर चित्रपट पाहिलाचित्रपटाच्या शेवटी डोळ्यातून अश्रु वाहिले  ते तसेच संपुर्ण रात्र वाहत राहिलेज्या बापाने कागदासारख्या नाजुक त्वचा असणाऱ्या लहान मुलाला काचेत ठेवतोएक टक्का त्यामुलाची जगण्याची संभवणा असली तरी बाप त्याला काचेत ठेवतो कारण बापाचा तो मुलगा असतोपरंतु बाप व्हेंटीलेटर वरती असतो तेव्हा त्याचा तो मुलगा व्हेंटीलेटर काढण्यास सांगतो आणि जेव्हा सत्य माहिती होतेतेव्हा तो बापाला वर्ष भर सुध्दा व्हेंटीलेटर वर ठेवण्यास तयार होतोमध्येच विराट कोहलीची मुलाखत पाहिलीलहाणपणी विराट कोहलीला त्याचे वडिल मैदानावरती स्कुटर वर सोडत होतेआज त्याच विराट कोहलीकडे मैदानावरती जाण्यासाठी सर्वांत महागडी ॲाडी कार आहे परंतु त्याचे वडिल नाहीतपु. देशपांडे यांच्या बाबतीतही असेचत्यांच्या वडिलांनी पु.वरती नाटकाचे  लिहिण्याचे जोहरी सारखे पैलू पाडण्याचे कार्य केलेपरंतु पु. नावाने ओळख नाटककार  विनोदी लेखक म्हणुन निर्माण केली आणि साहित्याच्या जगामध्ये हिऱ्यासारखे चमकलेत्याच हिऱ्याची चमकचकाकी पाहण्यासाठी त्यांचे जोहरी अर्थातच वडिल त्या क्षणी नव्हते !



ह्या अथांग असा विश्वामध्ये अनेक उदाहरणे सापडतीलपण जीवनात बाप एकच सापडतोकाल त्याचे पाच रुपये खर्च करुन पैसे शिल्लक राहिले होतेआज पाचशे रुपये खर्च करुन शे-दोनशे शिल्लक राहतातउद्या पाच हजार येतील  खर्च करुन हजार-दीड हजार उरतीलज्या पध्दतीने आपल्या लहानपणापासुन गरजा वाढत गेल्या तसा खर्च सुध्दा वाढलापण थोडा विचार केला तर बापामधले दुरावे सुध्दा वाढत गेलेनाही का ? त्या बापाला आम्ही रोज दोन शब्द जरी बोलले तरी खुप आहेदिवाळीसाठी स्वत:ला शर्ट घेण्यापुर्वी बापाला शर्ट घेऊबाप बाहेर जाताना त्यानेच घेऊन दिलेल्या दुचाकीवरती त्याला जबरदस्ती सोडून येऊअशी अनेक कळत-कळत कामे करुन आपण आपल्या बापाचे कष्ट कमी करु शकतोजेव्हा आपण स्वतबाप होतो तेव्हा आपल्याला आपल्या बापाची किंमत कळतेपरंतु तेव्हा वेळ निघून जातेआज आपल्या सोबत बाप आहे तसेच वेळही आहेजगु ना दोन क्षण बापासोबत…!



आपल्याला वरच्या उदाहरणांमध्ये यायचे आहे की बापासोबत दोन क्षण घालवून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करायचे हे त्याचे त्याने ठरवावे.


शेवटी एवढेच,



सर्व काही सोडुन शून्यातून जग निर्माण करतो,

स्वतउपाशी राहुन परिवाराची खळगी भरतो,

नाटककारापेक्षा जास्त नाटक तो खेळतो,

कारणबाप हा बापच असतो





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

Post a Comment