अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते…


जीवनामध्ये मित्रमैत्रीणी कमवले मी खुप काही,

एकटेपणात एकानेही आपुलकीने बोलले नाही,

उशीवरच्या महानद्यांसोबत दोस्ती तेव्हा होते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


कोणाचीही वाट  पाहता पुर्वेकडे उगवतो सुर्य,

स्वप्नांच्या व्यसनाने रातोरात पुर्ण करतो कार्य,

ह्या मतलबी जगात माझे स्वप्नच हरवते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


रोज जपतो मी त्या वाक्यप्रचारांची माळ,

तरी सुध्दा मनात पडतो शब्दांचा दुष्काळ,

लिहीता लिहीता जीवन कागदावर संपते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


रोज रात्री पाहतो मी चमकणारे चंद्र अन् तारे,

आजपर्यंत अनुभवले नाहीत खऱ्या प्रेमाचे वारे,

फळ्यावरती लिहीलेले नाव जीवनातुन मिटते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


संशोधन करताना पालथ्या घालतो मी दाही दिशा,

प्रश्नांमध्ये हरवून सुध्दा नाही मिळत उत्तरांची आशा,

वेळे मागे धावून सुध्दा जगासमोर विचार हरतो,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


कोण म्हणते साहित्याच्या विश्वात जगावे,

तर कोण म्हणते निर्सगाचे सौंदर्य पहावे,

जगता-पाहाता जीवनाचे नाटकच संपते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


सहण केले अपयश पण वाहिल्या त्सुनामी लाटा,

काय करु मीपरंतु मिटल्या सर्व आशेच्या वाटा,

लटकत असलेली ती कुरूप दोर मज बोलावते,

अन् ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते


नैराश्यतेची ती वाट मज आत्महत्येकडे घेऊन जाते,

जगासमोर मात्र मुखवटा धारण करुन गालात हसवते,

विश्व मला साहित्यिक व्यक्तीमत्तव म्हणुन संबोधते,

पाहता-पाहता कधीतर मिळणारे जीवन माझे संपते






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

Post a Comment