प्रत्येक घडणारी गोष्ट मी तीला सांगावे,
तासनतास तिला कॅाल वरती बोलत बसावे,
मॅसेज केला नाही तर लगेच माझ्यावर रागवावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी...
विज्ञानाच्या नवनवीन संशोधनाबद्दल तिने विचारावे,
तंत्रज्ञानातील अनेक बदलांचे स्पष्टीकरण द्यावे,
एखादे उत्तर नाही मिळाले तर लगेच रुसावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी...
कोजागिरीच्या चंद्राची तुलना तिच्यासोबत करावे,
आकाशातील विहंगाची कहानी तिला सांगावे,
लाजाळूच्या पानांप्रमानो ती लगेच लाजावी,
अन् एक मैत्रीण अशा असावी...
ग्रह-ताऱ्यांना ती काय करते विचारावे,
पक्ष्यांना तिच्याबद्दल खुप काही सांगावे,
तिचे नाव घेतले तर लगेच ती लपावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी...
मित्राच्या प्रत्येक समस्येचे उत्तर सांगावे,
आरशाप्रमाने चुकांचे दर्शण घडवावे,
मनामध्ये काहीही न ठेवतां मनसोक्त बोलावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी...
माझ्या अडचणींचे दरवाजे तिने खोलावे,
मनातील जखम आपुलकीच्या शब्दांनी भरावे,
दुःखाचा वाटा माझ्याकडून वाटून घ्यावी,
अन् एक मैत्रीण अशी असावी...
अशा मैत्रीणीवरती अनेक कविता माझ्या लेखणीतून लिहावे,
तिच्या नावाचे अर्थ पुस्तकांमध्ये पानापानावर शोधावे,
फुलांवरती खेळणारे फुलपाखरू अशी उपाधी मी तिला द्यावी,
अन् जीवनात एक मैत्रीण तर अशी असावी...
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Comments
Post a Comment