रात्र मला विचारते…

फुलांच्या रंगात फुलपाखरासारखे लपते,

दवबिंदू होऊन तणामध्ये सौंदर्य लपवते,

ताऱ्यांच्या पुंजक्यांमध्ये नेत्र तुला शोधते,

अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते


सुर्यास्त होताना आकाश तुझ्या रंगाने रंगते,

रात्रीच्या अंधारात ताऱ्यांना तु रंगवते,

वाहत्या पाण्यात प्रतिबिंब तुझे सतावते,

अगं सखे तुझ्याबद्दस हि रात्र मला विचारते


शुक्राच्या ताऱ्याचे नथ परिधान करुन सजते,

सप्तरंगाने रडणाऱ्या आकाशाला सजवते,

पक्ष्यांच्या किलबिलाटेने तु आल्याचे मज जाणवते,

अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते….


नभांसोबत एकटेपणाच्या उंभऱ्यावर रडते,

कधी कधी ह्या कवीला कुतुहलाने रडवते,

काय करावे ह्या चांदण्यांमध्ये माझे मन तुला शोधते,

अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते


ध्वनीच्या सदनात अस्वाभाविक रित्या विराजते,

संकटांच्या अडचणीत वेढलेल्याला विभागते,

वाट दाखवणाऱ्या वाटेला सुध्दा वाट पहावी वाटते,

अगं सखे तुझ्याबद्दस हि रात्र मला विचारते


सुर्याला मावळताना पाहुन स्वतमनात घाबरते,

चंद्राच्या शुभ्र प्रकाशाने त्या अंधारास घाबरवते,

प्रकाशही तुझ्या सांगण्यावरूनच खेळते,

अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते….


अगं सखे तुझ्याबद्दल हि रात्र मला विचारते,

माझ्या कवितेत तुझेच सौंदर्य वर्णते,

तुझ्याकडे पाहताच भावनांचे वादळ मनात वाहते,

तुझे व्यंगात्मक विस्मयचकित  विचार माझे मन वेधते





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment