चौकटीच्या बाहेर

अंधश्रद्धेने प्रत्येक गावात आपली मुळे रोवली,

भुत-प्रेतांच्या कथांनी मानवाला भीती घातली,

त्याच वेळी विज्ञानाने लेखकांना मदत मागितली

अन् अंधश्रद्धेसाठी लेखणी चौकटीच्या बाहेर आली.


पैसा-लत्त्याचा मुसळधार पाऊस बरसला,

निकाला अगोदरच असत्याचा विजय ठरला,

सत्याचे बोल प्रत्येकाच्या मनात तीने पेरली

अन् असत्यासाठी शाई चौकटीच्या बाहेर आली.


पाटीवरती लिहिलेले सर्वकाही विसरुन गेले,

चंद्र असुनही अज्ञानी अंधार सगळीकडे पसरले,

ज्ञानाची ज्योत प्रत्येक दारोदारी तीने पेटवली,

अन् अज्ञानासाठी मुळाक्षरे चौकटीच्या बाहेर आली.


भुतकाळातल्या सर्व चुका त्यांनी आम्हाला सांगितले,

तरी सुध्दा वर्तमानात आम्ही चुका पुन्हा केले,

भविष्यामधील सर्वच घटना मानवानुळेच  घडते,

अन् भविष्यासाठी पुस्तके चौकटीच्या बाहेर आले.


पहाटे गवताच्या पात्यावर दवबिंदू चमकले,

पाऊसामध्ये इंद्रधनुने आकाशाचे सौंदर्य वाढवले,

निर्सगाचे सौंदर्य रंगीबेरंगी चित्रांमधुन रेखाटले,

अन् कलेसाठी कागदे चौकटीच्या बाहेर आले.


क्षुल्लक कारणांवरून जवळची माणसे आम्ही दुरावली,

आयुष्याच्या शोधामध्ये तादात्म्सक नाते आम्ही निवारली,

शब्दांच्या कृपेने दुरावलेले नाते पुन्हा एकदा जोडले,

अन् मानवासाठी शब्द चौकटीच्या बाहेर आले


कवींनी प्रत्येक गोष्टींचे वर्णन कवितेतून केले,

लेखकांनी आनंद-दुःख लेखांमधून अनुभवले,

या सर्वांचे नाटक नाटककारांनी मानवाला दाखवले,

अन् मानवासाठी साहित्य चौकटीच्या बाहेर आले.







 कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments