मावळता सुर्य…

पहा ना, आशेचे किरण पुर्व दिशेने प्रोत्साहित करते,

न थांबतां, न थकता सदैव त्या वेळे मागे धावते,

पाऊसाळ्यात ढगांमागे तर हिवाळ्यात वायव्येकडे लपतो,

जाता जाता मावळता सुर्य खुप काही शिकवून जातो…


पहाटवेळी डोंगर-दऱ्यांमागुन कोणीतरी लपुन पाहते,

सुवर्ण किरणांमध्ये हिरवळीची शाल न्याहुन निघते,

सायंकाळी आकाशातल्या नभांसोबत रंगपंचमी खेळतो,

अन् हा मावळता सुर्य रंगांसोबत जीवन रंगवून जातो…


पक्ष्यांच्या किलबिलाटेने पहाटे स्वागत त्याचे होते,

तप्त ऊन असो वा हस्ताचा पाऊस, गरुड अकाशातच हिंडतो,

मावळताना घरट्यांच्या दिशेची वाट तोच दाखवतो,

अन् हा मावळता सुर्य गरुडझेप घेण्यास प्रोत्साहित करतो…


श्रावणात जणू काही त्याची येण्याची वाटत हरवते,

त्यामुळे प्रवासाची वाटही ओलीचिंब होऊनी जाते,

पण सायंकाळी मात्र ढगांमागुन डोकाऊन पाहतो,

अन् हा मावळता सुर्य थेंबांसोबतच लपाछुपी खेळतो…


नभ दाटतात, अन् दिवसाढवळ्या काळोख पसरते,

सोसाट्याच्या वाऱ्यासोबत थेंबांचेही आगमन होते,

नभांचा क्रोध शांत होताच इंद्रधनुला तो निमंत्रण पाठवतो,

अन् हा मावळता सुर्य आनंदच आनंद पसरवून जातो…


सुर्य किरणांमुळे बीजांमधील कोंबांना जीवनदान मिळते,

त्याच्याच आर्शिवादामुळे सागर नभांना निर्माण करते,

साऱ्या निर्सगाचे कालचक्र सुर्यदेवतेच्याच सहीने पुर्ण होतो,

अन् हा मावळता सुर्य विश्रांती हा शब्दच मिटवून जातो…


सुर्य मावळतो अन् अंधाराचा राज्य सगळीकडे पसरते,

त्या अंधारात ज्ञानांची ज्योत त्याच्यामुळेच पेटते,

काळोख्या अंधारातही शत्रूसोबत दोन हात करण्यास भाग पाडतो,

अन् हा मावळता सुर्य जीवन कसे जगावे हे शिकवून जातो…


जीवन विद्यार्थाचे असे वा सामर्थवान सैनीकाचे,

अंधारात राज्य पसरते अंधश्रद्धा व अज्ञानाचे,

आशेच्या किरणांमुळे रडण्यास नव्हे तर लढण्यास शिकवतो,

अन् हा मावळता सुर्य वाटेवर चालता-चालता मावळतो…





विषय सुचवणारे - कु. वैष्णवी गोपीनाथ फरताडे.

                            ( तेरखेडा, सोलापुर )




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.




Comments

  1. Dada...words nahiyet yaar😍
    Khup chan rachliye Poem❤
    Garudjhep ani student satti inspiration wali lines aavdlya khup😌😌

    ReplyDelete
  2. Dada...words nahiyet yaar😍
    Khup chan rachliye Poem❤
    Garudjhep ani student satti inspiration wali lines aavdlya khup😌😌

    ReplyDelete
  3. khup chan 👌👌🙌 suryache ani jivnache ek anokhe nate adbhut shabdat spast keley

    ReplyDelete
  4. Very beautiful beta , you have a lot of vocabulary. Keep it up ! God bless you .

    ReplyDelete
  5. ❤️❤️❤️❤️❤️❤️

    ReplyDelete
  6. खूपच छान आहे...एकदम कडक...
    Words aani vichar donhi khup chhan hot...

    ReplyDelete
  7. So nice ❤❤👏👏

    ReplyDelete

Post a Comment