लवकरच घरी परततोय…

हातात घेऊन रायफल, सीमारेषांवर पहारा देतोय,

दिवस असो वा रात्र कर्तव्य मी माझे बजावतोय,

सकाळचे ते राष्ट्रगीत अंगात स्पृर्ती निर्माण करते,

पाहता पाहता दिवसांमागुन दिवस असेच सरते.


पार केली कधी ती हिरवळीतील ओसाड जंगले,

संपवले कधी रस्ते उष्ण कटिबंधी वाळवंटातले,

दुश्मन सदैव रंगवतो सीमारेषा पार करण्याचे चित्र,

आर्शिवाद त्याचे, लाभली आम्हास हिमालयासारखा मित्र.


वायुसेनेस मिळाले राफेल सारखे आधुनिक शस्त्रे,

संरक्षणात लाभले कलामांनी तयार केलेली क्षेपणास्त्रे,

अग्नी किंवा नाग जेव्हा प्रत्यक्ष युध्दात उतरतो,

लपलेल्या आतंकवाद्यांना सुध्दा घाम तेव्हा सुटतो.


जहाजांमधुन पार केल्या खुप त्सुनामी लाटा,

घुसखोऱ्यांना दाखविल्या आम्ही परतीच्या वाटा,

दुरदुर पर्यंत दिसते फक्त त्या समुद्राची रेती,

सारखी आठवणीत गुंतते गाव व गावची माती.


टोळी मधला एक जवान घरातून इथे परतला,

येताना चकली,चिवडा अन् लाडूही घेऊन आला,

आई तुझ्याहाताची चव आजही मला आठवते,

धरतीच्या कुशीत झोपताना कानात तुझी लोरी गुंजते.


इथे सीमारेषांवर आजही रंगते गोळ्या-बंदुंकांची होळी,

आनंद तुमच्यात, घ्या सुखाने दसऱ्या-दिवळीची पोळी,

कधी जमिनीखालून तर कधी जंगलातून आतंकवादी येतोय,

खुप चांगल्या रितीने पाहुनचार आम्ही त्यांचे करतोय.


देवही न जाने, पण का रंगतात ही रणांगणे,

वाट पाहता पाहता ओसाड होतात घरची अंगणे,

पहारा देतां-देतां अनेक घाव झेलले मी छातीवर,

म्हणुनच अभिमानाने तिरंगा फडकतोय कारगीलवर.


झोपता-झोपता परिवाराचे मी छायाचित्र पाहिले,

तुमच्या आठवणीचे अश्रू मात्र नयनामध्येच राहिले,

अर्धांगीनीच्या मनातील आठवणींचे चित्र तो टिपतोय, 

काळोख्या आकाशात शुंभ्र चंद्र तिच्याबद्दल सांगतोय.


मनातील भावना कागदावरती रंगवल्या शाईने,

माझे हे पत्र वाचून डोळे ओले केले माझ्या आईने,

लिहून देतो आई, मी तुझी अन् भारत मातेची रक्षा करतोय,

मी माझे कर्तव्य बजाऊन लवकरच घरी परततोय,

                                              लवकरच घरी परततोय…





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.



Comments

Post a Comment