मेघराजा, आता तरी बरस ना…

बरसेल पाऊस अन् संपत आला मे चा महिणा,

खांद्यावरती नांगर घेऊन तयारच आहे पाहुना,

फोडले ढेकळे शेतशिवाराची झाली नांगरणी,

आल्यास पाऊस एकदा, बियानांची करू पेरणी.


बरसतील थेंब,ओलीचिंब होईल काळी माती,

डोकाऊन पाहतील कोंब बाजूला सारुनी रेती,

येईल सुर्यप्रकाश, दवबिंदू चमकतील पात्यांवर,

खुप वाट पाहिली छत येईल मुक्यांच्या गोठ्यावर.


पण काय करावे आकाश मात्र कोरडेच दिसतयं,

पण अर्धांगीनीच्या डोळ्यात दीन-अश्रू लपतयं,

तयारीतच आहेत बैलं घेऊन नांगर खांद्यावर,

दररोज कर्जांचे व्याज वाढते ताण येतो डोक्यावर.


जात आहेत दिवस तसेच, पडेल का पाऊस ?

जाईल वाळून मागच्या महिन्यात लावलेला उस,

तळ्यासोबतच विहिरीत शोधत आहे मी पाणी,

सांग रे देवा, परिवारासंगे गातां येईल का सुखाची गाणी.


बरसे रे नभा, वाट पाहतोय आठवड्यातील सर्व वार,

का दरवर्षी प्रमाने करावी लागेल मला पेरणी दुबार ?

गॅस संपले आता, चुल पेटवण्यासाठी शोधतोय मोळी,

विना रंगांचीच खेळतील माझी मुले ह्यावर्षी ती होळी.


पेटेल का माझ्या घरातही ह्या दिवाळीची दिवा,

असेल का फराळात आमच्या करंजी व खवा,

भरभराट होईल मग कमी पडणार नाही कपडे अन् लत्ता,

जेव्हा रानात आमुच्या बरसणाऱ्या पाऊसाची सत्ता. 


नाही पडला पाऊस तर रानात सोडू आम्ही नेटकी-बोर,

पण पाणीच संपल्यावर झाडाला लटकेल मग दोर,

पसरतो दुष्काळ अन् ओसाड पडुनी जातात मग गाव,

हे जगही क्रुर किती, बळीराजा म्हणुन दिले आम्हास नाव.


जगाचा पोशींदा म्हणुन सारे विश्व ओळखते रे मला,

सांग नभा तुच, बरसाचे आहे की नाही रे तुला ?

पेटेल रे मग माझ्या हि घरात आनंदाची चुल,

दोन वेळेचे पोटभर जेवतील बायको अन् मुल.


अरे मेघराजा, साकडे घालतोय रे मी तुला,

या काळ्या मातीसोबत भिजव रे मला,

ह्या बियांमधील कोंबांनातरी जीवनदान दे ना,

मेघराजा, आता तरी बरस ना !

                            आता तरी बरस ना !



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. fabulous,reality based and heart touching 😥🔥🔥👌

    ReplyDelete
  2. शेतकऱ्यांची मेघ राजा बद्दल असणारी कळकळ खूप छान रीतीने व्यक्त केली आहे 😊😊💖

    ReplyDelete
  3. Meghraja hya kali matibarober mala hi bhijav...favourite 😍
    God gifted Dada❤

    ReplyDelete
  4. खूप छान.....shivam

    ReplyDelete
  5. Poem is good but just work on language. Rather than all good

    ReplyDelete
  6. छान कविता👌👌

    ReplyDelete
  7. भारी...🔥🔥🔥✍🏻
    Good one ✍🏻👌🏻👌🏻🙌
    खूप चांगल्या पद्धतीने लिहीले आहे तु👌🏻🙌🙌🙌✍🏻
    अगदी खरंय......😯🙌🙌✍🏻👌🏻

    ReplyDelete
  8. Heart touching poem. Shivam you are also good author.

    ReplyDelete
  9. छान अप्रतिम 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  10. Heart touching and reality based poem .l really like this poem.👍👍😁😎😎😎☝️☝️☝️

    ReplyDelete

Post a Comment