गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतोय !

माथ्यावरचा सुर्य डोंगरदऱ्यांमागे लपण्यास गेला,

प्रकाशाची वाट चुकली व तो हरवला गेला,

दिसू लागले तारे अन् वाहु लागले थंडगार वारे,

चोहीकडे पसरले गेले अंधाराचे राज्य सारे.


घरट्याकडे परतताना चालू झाले किलबिलाटेचे पाढे,

केर काढुनी दारासमोरील, मारले गेले पाण्याने सडे,

वातावरण पाहुनी गोठ्याकडे परतली गुरे अन् ढोरे,

आकाशही भासू लागले जसे कागदच आहे कोरे.


हात जोडून देवबप्पासमोर केले विठूरायाचे स्मरण,

पसरला जरी अंधार, विश्वासाने भरले मन,

म्हटले ज्ञानोबांचे पसायदान अन तुकोबांच्या ओवी,

लहानश्या ज्योतीने ज्ञानाचा प्रकाश पसरवला गावो-गावी.


ज्योत पेटवुनी ज्ञानांची अंधारास आम्ही हरवले,

पाटी-पेन्सील सोबत पुस्तकेही हातात धरले,

हात जोडून स्मरण केले व पावली सरस्वती माता,

मुळाक्षरांची ओळख करुन देत होती जन्मदाता.


काय माहिती पण आजचा सुर्य इमारतींमागे लपतो,

अंघाराचे राज्य मात्र विजेचा प्रकाश जिंकतो,

पंचेचाळीस ओलांडतात मग तापमानाचे पारे,

दिवस असो वा रात्र, घरोघरी वाहतात ए.सी.चे वारे.


मावळतो सुर्य तरी ऐकू येत नाहीत पोळ्यांचे पाढे,

बंद करुन दारे, कानावर येतात रिंगटोनचे सडे,

आले घोर कलियुग व मानवच झाले गुरे अन ढोरे,

अन् जीवन भासते स्वत:चे जनू कागदच असावे कोरे.


हात जोडून दुरध्वनीसमोर केले गुगलचे स्मरण,

वाढले गैरसमज, अविश्वासाने भरले गेले मन,

क्रोधाने विटले मन, गाऊ लागले भांडण-तंट्याची ओवी,

अंधाराच्या राज्याने अंधश्रद्धा वाढलो गावो-गावी.


दुर शहरात कामाला आहे म्हणुन कोणालाही बोलत नाही,

अन् कामात आहे म्हणुन परिवासही बोलले शब्द काही,

घरची दारे बंद करुन, एकटा आहे म्हणुन तो आता रडतोय,

दिलखुशाल पणे सार्वजनिक माध्यमांवर दुःख व्यक्त करतोय.


दिवसेंदिवस खुप कमी होत गेला तो संवाद,

वाढला संख्या परिवार सदस्यांसोबत वाद,

तेव्हा हात जोडले गेले ढोंगी ज्योतीशासमोर,

पैसे आहेत तोपर्यंत नाचतोय हा अहंकारी मोर.


सर्व काही पाहुनी हा कवी कविता रचतोय,

मनाची दारे लावून गैरसमज मनात पसरवतोय,

जीवनातील खऱ्या मित्रांना आंतरजालावर बोलतोय,

दर्पनासारखे कार्य करुनही मानव मात्र रडतोय.


रस्त्यावर जाणारे प्रचंड वेगाने वाहने मी पाहतोय,

वाहनांतील मानसाचे वेडे मन मी वाचतोय,

या परिस्थितीवर सायंकाळी निमुटपणे लिहीतोय,

अन् गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतोय !




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

Post a Comment