चमकणारे सोने

सुर्योदयाच्या पुर्वीच त्यांचा दिवस उजाडतो,

सुर्याचा अस्त झाला तरीही तो तेथेच असतो,

काळोख्या रात्रीही सरावाचे उरतात चाचण्या काही,

दिवस सरला रात्र आली तरी स्वप्न झोपू देत नाही.


घामात ओली होती ती मैदानावरील लाल माती,

तिरंग्यास पाहुन उत्साहाने भरते आमुची छाती,

रक्तबंबाळ होऊनही शेवट पर्यंत धावतात पावले,

अंतीमरेषा पार करातानाही मात देत नाहीत सावले.


घड्याळातील काट्यांना मागे टाकत धावतो,

पाण्यातील उंच लाटांना चिरून पोहतो,

वर्षानुवर्षांचे विक्रम मोडतो हातातील भाला,

तोफ्यांमधुन फेकल्यासारखा भासतो वजनी गोळा.


प्रयत्न असे असतात जसा वाटतो स्वप्नांचा आभास,

कोणतेही असो मैदान घडवला जातो इतिहास,

वाट अशी पाहतो, जशी चातकासारखी तहान,

सर्वांना मागे टाकुनही जिंकल्याचे विसरते भान.


धावता धावता मागे राहुनी जातात  त्या सिमारेषा,

अपार कष्टांमुळे पुर्ण होतात स्वप्नांमधल्या आशा,

मने जिंकून प्रेक्षकांची, सुरु होतो अखंड प्रवास,

छातीवरती पदक स्वीकारताना जोरात धावतो श्वास.


उघड्या डोळ्यांनी अशक्य स्वप्न तो पाहतो,

ॲालंपिक मध्ये सत्यात स्वप्न तो रंगवतो,

आकाशात रंगते त्या तीन कॅरी तिरंग्याची शान,

देशभक्तीचे वातावरण निर्माण करते माझे राष्ट्रगान.


अनेकांना मात देऊन सुशोभित हातात येते कास्य,

पाहण्यासारखे असते खेळाडूच्या चेहऱ्यावरील हास्य,

अनेकांना सुफुर्त केली जातात पदके चांदीची,

खरंच, इतिहास रचते शर्यंत ॲालंपिकची.


शेवटी,

लाल मातीतल्या मैदानावर घाम गाळते ते कष्टाचे सोने,

उंच अशा गगणात गरुडझेप घेते ते गगणभरारीचे सोने,

तिरंग्यासोबत राष्ट्रगीत सादर करते ते देशभक्तीचे सोने,

जबाबदाऱ्यांच्या छातीवर इतिहास घडवतो ते चमकणारे सोने.






कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments