ढगांना थेंबही जड झाले.

क्रोधाने तापलेले सुर्यदेव माथ्यावर आले,

पाण्याचे बाष्प होऊन ढगात रुपांतर झाले,

वाहता वारा, पर्वतांनी अडवले रस्ते काही,

मात देत संकटांवरी, निश्चय मात्र सोडला नाही.


चालाता चालता पायास भाजत होती रेती,

पाऊसाच्या थेंबांसाठी तहानली होती माती,

प्रतिक्षा करत बेडकांनी घालवली पुर्ण रात,

चोच उघडून चातकही पाहत होते वाट.


खांद्यावर घेऊन टिफन बैलांसंगे झाली नांगरणी,

ओली होताच काळी माती बियांची होईल पेरणी,

शेतकऱ्यासंगे चातकाचीही भागेल वर्षांची तहान,

नभांमधुन बरसणारे थेंब आहेत विदुषक महान.


वर्षांव होताच मातीवर सुगंध हवेत दरवळेल,

सुर्याच्या सुर्यकिरणात पात्यावर दवबिंदू चमकेल,

उघड्या डोळ्यांनी आभाळाने पाहिले स्वप्न सोन्याचे,

भीती अशी, या शुभकार्यास नजर लागेल का कोणाचे ?


दाब झाला कमी, क्रोधेने वाहू लागले वादळी वारे,

चक्रिवादळांनी नष्ट केली निर्सगरम्य किनारे,

डोंगर पर्वतांवरील दरड जमिनीवर कोसळली,

रातोरात अनेक गावे जमिनीखाली हरवली.


घरात घुसते पाणी, पाण्यात जातात घरे अन् थांबत नाही पाऊस,

ज्वारी असो वा मका, भाजीपाल्यासंगे पाण्याखाली जातो उस,

मिळत नाही आधार त्यांना वाहूनी जातात गुरे-ढोरे,

सांगा रे नभांनो, भुस्कलन-पुर आहेत का तुमची उत्तरे ?


पाण्यात गेली आंब्यांची बने, मोर नाही नाचला,

सांत्वना करत प्रत्येकाची बेडकाचा आवाज बसला,

आशेचा किरण उगवला पण दवबिंदू मात्र रडले,

वाट पाहणाऱ्या चातकाच्या चोचीत अश्रूच राहिले.


कोमजली फुले, नाही भिरभिरले फुलपाखरू काही,

पाहुन दु:ख साऱ्यांचे इंद्रधनुची कमान उगवली नाही,

पाहुन हाहाकार सारा, कोकीळा राहिली दंग,

अक्रोश ऐकुन सारे रंगच झाले बेरंग.


भोळ्या मानवाचे की इवल्याश्या बेघर मुक्यांचे, 

पत्र पाठवून सांत्वन करावे तरी कोणाचे ?

एकीकडे दुष्काळ दुसरीकडे महापुर, संकाटात सापडल्या दाही दिशा,

“ओळखलत का सर मला” ह्या कवितेने मिळाल्या प्रत्येकाला आशा.


एकटेपणाच्या विश्वात दुःखी होऊन भरकटले,

अश्रू लपविण्यासाठी आकाशाच्या कुशीत गेले,

विजेच्या आक्रोशासह एकमेकांवरती भिडले,

पाहता-पाहता ढगांना स्वत:चे थेंबही जड झाले.





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.




Comments

  1. Wow marvelous line... superb Shivam nice kavita

    ReplyDelete
  2. खुप छान लिहलय!! कवितेचा आशय आणि विषय खुप छान आहे !!👍🙌✨

    ReplyDelete
  3. खुप छान...

    सत्यता लेखणीतुन डोळ्यासमोर रेखटते.

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना सर जी ✍️👌👌

    ReplyDelete
  5. खूप छान कविता आशयगर्भित

    ReplyDelete
  6. खुप सुंदर कविता शिवम् अप्रतिम काव्य रचना खरच कोणाला पत्र पाठवावं सांत्वनासाठी हाच मनाला पडलेला प्रश्न???.. छान कल्पना पुढील लेखनासाठी खुप खुप शुभेच्छा शिवम् छान लिहित आहेस.

    ReplyDelete
  7. अप्रतिम कविता

    ReplyDelete
  8. खूप खूप छान लिहिली आहे सर कविता. बढिया..

    ReplyDelete
  9. खूप खूप छान लिहिली आहे सर कविता..

    ReplyDelete
  10. छान लिहले आहे ..साध्याशब्दातुन न पडनारा पाऊस आणी काहीचे संसार उध्वस्त करनारा पाऊस यात सापडलेल्या सामाऩ्य माणसाची कैफियत मांडन्याचा प्रयत्न लेखकाने केलाये .....👍👍😊😊

    ReplyDelete
  11. खूपच अप्रतिम...👌👌

    ReplyDelete
  12. खुप छान अप्रतिम लिखाण

    ReplyDelete
  13. खूपच अप्रतिम ,कवि ने सत्यता आपल्या लेखनीतुन रेखांकित केलेली आहे

    ReplyDelete
  14. Khup chhan shabdankan 👌very nice poem

    ReplyDelete
  15. खूप खूप सुंदर कविता

    ReplyDelete
  16. अर्थपुर्ण कविता

    ReplyDelete
  17. खुप छान आहे कविता

    ReplyDelete
  18. खूप छान

    ReplyDelete

Post a Comment