चला देश घडवू या !

अरे पर्वता, अरे सागरा, ऐक तेजस्वी भास्करा,

माझ्या भारताचे गुणगान गातो उंच अंबरा,

राष्ट्रभक्तीचे गीत सप्तसुरात गाऊ या,

चला देश घडवू या !


अरे तरुणा, विसर आता पारतंत्र्याच्या रेषा,

स्वातंत्र्याच्या जल्लोशाने अजरामर झाल्या दाही दिशा,

समतेचे धडे शिकवूनी जगात नांदू या

चला देश घडवू या !


अन्यायाविरुध्द मराठमोळी तलवार हाती,

स्वतंत्र्याचे गुणगान गाते माझीच माती,

तोच इतिहास पुन्हा नव्याने आठवू या,

चला देश घडवू या !


देशात घडले माझ्या बोस, शास्त्री अन् बापू,

भगतसिंगांचे कार्य युवकांच्या मना-मनात छापू,

क्रांतीकारकांच्या विचारांचे बीज आपण पेरू या,

चला देश घडवू या !


संस्कृतीचा वारसा जपुनी गाजे माझ्या संतांची वाणी,

प्रत्येक लेकीत फुलो माझ्या स्वतंत्र्य झांशीची रानी,

एकसुत्री अन्यायाविरुध्द आवाज आपण उठवू या,

चला देश घडवू या !


अरे हाच माझा भारत हाच माझा हिंदुस्तान,

हिमालय पर्वत व हिंद महासागर लाभले आम्हास वरदान,

अतुट बंधुतेचे चित्र दारो-दारी रंगवू या,

चला देश घडवू या !


अहिंसेचे गीत गाऊ या,

शांततेचे धडे जगा देऊ या,

तिरंग्यास उंच गगणी पाहु या,

चला देश घडवू या, 

               चला देश घडवू या !





कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

  1. खूप छान लिहलय!!👌अप्रतीम रचना 👍👏

    ReplyDelete
  2. खुप सही💫👌🏻👌🏻👌🏻
    Nice one 👌🏻👌🏻💫
    Too GoOd 🙌🔥🔥

    ReplyDelete
  3. Fabulous 😍💫

    ReplyDelete
  4. Awesome re😍💫

    ReplyDelete
  5. Fabulous 😍💫

    ReplyDelete
  6. अप्रतिम रचना 🔥👌

    प्रत्येक माणसात देशभक्तीचे विचार पेरूया,
    चला एक स्वप्नातला देश घडवूया .

    ReplyDelete

Post a Comment