अबोल होते शब्द…

अबोल होते शब्द, पाहुनी त्या घटना,

सोसुनी अन्याय सारे,भोगल्या नरक यातना,

घेऊन लेखणी हातात, व्यक्त करतोय क्रोध,

अनुभवाचे बोल ऐकुनी, लिहितोय मी बोध.


अबोल होते शब्द, मुक्या झाल्या भावना,

नैराश्य सोडुन मागे, कवितेतुन मांडल्या संवेदना,

न बोलता काही, निर्मान झाला दुरावा,

विटले मन माझे, राहिला भूतकाळाचा पुरावा.


अबोल होते शब्द, अचानक बोलु लागल्या भावना,

जान होऊनी परिस्थितीची, संपल्या साऱ्या वेदना,

अबोल शब्द होते, लेखणी होती बोलत,

जबाबदाऱ्या पार पाडून, स्वाप्नांची दारे खोलत.


अबोल होत शब्द, पाहुन स्वताचे प्रतिबिंब,

भिजुन एकांताच्या थेंबात, देह झाला ओलाचिंब,

निद्रा येत नाही रात्री, करतो स्वप्नांशी संवाद,

बजावुन कर्तव्ये सारी, मिटेल का ध्येय वेड्याचा वाद?


अबोल होते शब्द, अबोलच ते राहिले,

पाठलाग करता स्वप्नांचा, मागे न वळुन पहिले,

अबोल राहिले शब्द, स्वप्न मिटले गेले,

हसुन माझ्याच दुविधेवर, सर्व कवितेतुन मी मांडले.



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. अप्रतिम कविता

    ReplyDelete
    Replies
    1. Khupch chhan...shivam..kharokhar khupch chhan kavi ahes..keep it up...👍👌👌😊

      Delete
  2. अप्रतिम रचना 👌👍

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर...😊🤝👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम...👌🤝😊

    ReplyDelete
  5. खुप सुंदर कविता 👍👍👍

    ReplyDelete
  6. Mast...👏👍👍👍👍👍👍

    ReplyDelete

Post a Comment