भविष्य माझ्या
राष्ट्राचे आहे तरुणाईच्या हाती,
वाटचाल करता
ध्येयाकडे, मन का तुमचे थकुन
जाती ?
ध्येयाची वाट मध्यात सोडने, हाच आहे दगा
हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो !
स्वातंत्र्य मिळण्या
देशासाठी वार झेलेल छातीवर,
दोन हात करता शत्रुशी
रक्त वाहिले मातीवर,
विचार विसरणे क्रांतीकारकांचे, हाच आहे दगा
हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो !
अंधार झाला अज्ञानाचा
म्हणुन पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती,
दुरावे झाले निर्माण
एकतेत येताच जाती अन् पाती,
आपापसांतच भांडणे, हाच आहे दगा
हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो !
मानव जिवंत असुनही
मानवता मानवता इथे मरते,
अन्याय पाहुन तिथे, देह त्यांचा सहन करते,
समानतेला आपुल्या तडा देणे, हाच आहे दगा
हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो !
एका अनमोल मतासाठी
घेतली त्याने हजारोंची लाच,
अन्याय सोसुनी आता
पाहतोय ढोंग्यांचा नाच,
भ्रष्ट्राचारास सहयोग करणे, हाच आहे दगा
हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो !
देशाच्या
साधनसंपत्तीची निगा राखणे ही आपुलीच जबाबदारी,
संविधानाचे पालन करणे
आहे नागरिकत्वाची पहिली पायरी,
स्वामी विवेकानंदांचे विचार आपुल्या जीवनात
तुम्ही तुम्ही मागा हो,
अरे माझ्या देशाच्या युवका आज तु जागा हो,
आज तु जागा हो !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
nice..
ReplyDelete💯🔥👏
ReplyDeleteVery nice poem😍
ReplyDeleteNice✌️✌️✌️
ReplyDeleteखुप सुंदर कविता आहे 👍👍
ReplyDeleteखूप सुंदर आहे
ReplyDeleteSuperrrrrrr😎😍
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteNice 😍
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice shivam
ReplyDeleteछान!!👍
ReplyDeleteSuperb ✨
ReplyDeleteGreat words...
ReplyDelete🤞🙌👍🏻
ReplyDeleteखुप खुप अभिनंदन. अतिशय सुंदर रचना आहे. लिहित रहा.
ReplyDelete👌👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteVery nice creation Shivam..It will definitely Inspire to youth of India
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteछान काव्यरचना👍👌
ReplyDelete👍👍👍nice
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteमस्त
ReplyDelete