ते दिवस आठवतात...

शाळेत येताच अचानकपणे मी तुला पहावे,

चलता-चालता तुझ्या पवलांवरती मी पाऊल ठेवावे,

तीच पाऊले अन् तीच रस्ते तुझीच वाट दाखवतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


वर्गात येताना तुझ्याकडे पाहत यावे,

तुझ्या बाजूच्या बाकावर मी येऊन बसावे,

आजही ते बाक तुझी चाहूल मला देतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


पाहता तुझ्याकडे एकापेक्षा एक कविता मी रचावे,

त्याच कविता वर्गासामोर वाचून प्रेम व्यक्त करावे,

आजही त्या कविता तुझ्याबद्दलच सांगतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


वर्गात शिकविताना प्रश्नांमागे प्रश्न मी विचारावे,

प्रश्न-उत्तरांच्या खेळत तुझी नजर माझ्याकडे खेचावे,

घायल करणारी तुझी नजरे उत्तरे मला देतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


रासायनातील प्रयोग करताना तुझेच प्रयोग पहावे,

रासायनिक सूत्राएवजी तुझ्या नावाचे रसायने मी बनवावे,

तेच रसायने आज खूप काही प्रतिक्रिया दर्शवतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


बोलण्यासाठी तुला स्वाच्छ अक्षरात प्रेमपत्र मी लिहावे,

तेच प्रेमपत्र देण्यासाठी तुझ्या मागोमाग मी भटकावे,

आजही ते प्रेमपत्र आपल्या प्रेमाबद्दलच सांगतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...


शाळा सुटली की मी तुझ्याच मागोमाग धावावे,

मी पाठलाग करतो म्हणून तूही सावकाश चालावे,

मी धावताना अन् तू चालताना आपले ह्रदय एकावेळीच धडधडतात,

आणि ते दिवस मला अजूनही आठवतात...

 

आपले ते दिवस मला अजूनही आठवतात,

ते प्रेमपत्र आणि त्या कविता तुझ्याबद्दल सांगतात,

त्यानंतर न मी पहिले तुला अन् तू पहिले मला,

                  तरकांमध्येच तुझे चेहरे दिसतात,

आणि त्या आठवणी मात्र आठवणीतच राहतात...   




कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment