पृथ्वीवरचे जीवन व अवकाश.

कोण आहोत आपण? ह्या संपुर्ण ब्रम्हांडामध्ये एक आकाशगंगा नावाचा तारकामंडळ त्यामध्ये कोणत्यातरी कोपऱ्यात वसलेली आपली सुर्यमाला व या तारकामंडळाच्या बरोबर मधल्या भागात तो कृष्णविवर. अशा त्या कोपऱ्यात असलेल्या त्या सुर्यमालेमध्ये आपण माहिती असलेल्या ८ ग्रह ( अनुमानानुसार असे २-३ ग्रह संशयीत आहेत जे कधी तरी दिसलेले आहेत किंवा त्यांचे पुरावे मिळालेले आहेत परंतु कालांतरानंतर ते दिसलेले नाहीत उदा. प्लुटो ) त्या ग्रहांपैकी आपण पृथ्वीवरती राहतो. पृथ्वी ची कक्षा १४९.६ दशलक्ष किलोमीटर व सुर्यांपासुन  निघालेला तोच प्रकाश किरण ८.२ मिनीटानंतर ह्या पृथ्वीवरती पोहोचते. पृथ्वीला निर्सगाकडून देणगीच्या स्वरुपात मिळालेला तो चंद्र. पांढराशुभ्र चंद्र, जो स्वत: भोवती न फिरणारा परंतु पृथ्वीभोवती फिरत फिरत ह्या सुर्याची प्रदक्षिणा पुर्ण करतो. यासर्वांसोबत तो चंद्र, आपल्या पृथ्वीसोबतचे सर्व ग्रह व सुर्य देखील आपल्या तारकामंडळाच्या केंद्रस्थानी असलेल्या त्या सर्वात जास्त घनता तसेच भव्या अश्या त्या कृष्णविवराभोवती फिरतो. आपली ही तारकामंडळ कोणाभोवती तर फिरत असणारच. काय माहिती ? ईथे पर्यंतच माहिती आपल्याला मिळाली आहे. अशा ह्या शेकडो तारकापुंज, लाखो सुर्यमाला व करोडो-अज्बो ग्रहांपैकी आपण त्या पृथ्वी वरती राहतो. काय वैशिष्ट्य आहे पहा ना, ह्या सर्वांपैकी फक्त पृथ्वीवरतीच जीवसृष्टी उपलब्ध आहे. काही ग्रहांवरती जीवसृष्टी सापडली परंतु त्याच्या मधले अंतर किलोमीटर नव्हे तर प्रकाशवर्षामध्ये मोजले जाते ( १ प्रकाशवर्ष = ९.४१७ * १०^१५ मीटर ) तेथे जाणे म्हणजे आता सध्याच्या तंत्रज्ञानाने खोडक्यात अश्यक्यच!


मानवप्राणी हा असा प्राणी आहे ज्याला कितीही दिले तर पोट भरेल परंतु त्याचे ते मन किंवा चित्त आजिबात नाही भरणार. ह्याच हव्यासापोटी हा मानव त्यामध्ये हा लेख लिहीणारा मी व आपण वाचणारे हे वाचक सुध्दा ‘पृथ्वी सोडुन दुसरी कोणत्या ग्रहावरती जीवसृष्टी सापडते का ?’ या प्रश्नाच्या शोधात आहोत. या शोधामध्ये आपण, अनेक शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी दिवसरात्र एक केली व त्यांनी समाधानकारक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यापैकी अनेक प्रश्न म्हणजे ‘ फक्त पृथ्वीवरतीच जीवन आहे का?’ ; ‘दुसऱ्याकोणत्या ग्रहावरती पाणी आहे?’ असे अनेक प्रश्न जे फक्त शास्त्रज्ञांना नव्हेच तर मलाही सुचतात. अशा असंख्या प्रश्नांपैकी आता ह्या घडीला किती प्रश्न पुर्णत: सुटले? माझ्या अभ्यासानुसार एकही नाही. परंतु हे प्रश्न कधी सुटणार काही अंदाजही नाही आणि काही पुरावा. दररोज नवनविन तंत्रज्ञान विकसीत होते, दररोज नवनवीन पुरावे समोर येतात, काल घडलेली गोष्ट आज दिसत नाही, का बरे? पुरावे पुरावे राहतच नाहीत, पुस्तकांची पाने भरतात, लेखणी लिहीतच जाते आणि हा मानव विचार करतच राहतो; तरीही यश नाही मिळत.


या सर्वांच्या सुरवाती मध्ये खुप साऱ्या नव्या गोष्टी समोर आल्या. नासा ( NASA ) च्या माहिती अनुसार १९६० पासुन शुक्र ग्रहावरती असलेल्या जीवसृष्टीचा अभ्यास चालू होता. सुरूवातीला पॅनस्पर्मियाचा सिध्दांत मांडला गेला त्यानंतर प्रलयंकारीची घटनेचा अनुमान जोडला गेला. काही लोक सहमत होती तर काही प्रश्न असे सांगत होते की त्याचे उत्तरे असहमत. सप्टेंबर १९६७ मध्ये एक गोष्ट अशी लक्षात आली की त्या शुक्र ग्रहावरती वातारवरण पुरक तापमान ३१ मैल( ५० किमी ) पृष्ठटभागापासुन उपलब्ध आहे. जवळपास तापमान कमीतकमी -२0° सेल्सियस ते जास्तीतजास्त ६५° सेल्सियस आढळले. त्यानंतर ॲागस्ट २०१९ मध्ये असे दिसले की अतिनील किरणे ( UV Rays ) शोषून घेणारे काही रसायने किंवा काही सुक्ष्मजीवांच्या वसाहती असाव्यात असा अंदाज बांधला गेला. जानेवारी २०२० रोजी अभ्यासकांच्या सिध्दांतामधुन असे समजले की शुक्र ग्रहावरती काही ज्वालामुखीचे विस्फोट आढळले आहेत जे फक्त काही सुक्ष्मजीवांमुळेच होतात. त्यानंतर सर्वात जास्त धक्का बसावणारी माहिती म्हणजेच सप्टेंबर २०२० मध्ये असे आढळून आले की शुक्र ग्रहावरती फॅास्पाईन (PH_3 ) आहे. फॅास्पाईनचे तेथे उपस्थिती असे दर्शवतो की शुक्र ग्रहावरती प्रसंशनीय परंतु सुक्ष्म प्रमानामध्ये जीवसृष्टी दिसुन आली. त्यानंतर शुक्र ग्रहाबद्दल जी फॅास्पाईनची माहिती दिली होती ती खोटी आहे अशी माहीती आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रय संघटने( IAU ) ने सांगितले. त्यांनी कारण दिले की जे पुरावे आमच्या कडे दिले गेले ते आम्हाला दिसलेच नाहित व आमची परवानगी न घेताच लोकांना सांगुन त्यांची दिशाभूल केली गेली. अशाच खुप साऱ्या गोष्टी आहेत. लिहीत गेल्यावर कदाचित पुस्तकांचे अनेक भागांमध्ये प्रकाशन करावे लागेल.


चंद्रासाठी पण ह्याच प्रकारची काही घटना आहे.त्याची सर्वात पहिली माहिती आपल्याला भारताच्या ईजरो ( ISRO ) ने तयार केलेल्या चंद्रयान - १ द्वारे केलेल्या अभ्यासामधुन सांगितले. सप्टेंबर २४, २००८ रोजी ईजरो ने नासा ला माहिती दिली की M3 द्वारे केलेल्या अभ्यासातुन माहिती दिली की चंद्रावरील शॅकल्टन खड्ड्यात पाणी नव्हे तर बर्फ आहे. ते नासा ( NASA ) ने सुध्दा शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नासा ने अंदाज लावला की चंद्राच्या ध्रुवीय भागांत सुध्दा पाणी किंवा बर्फ असु शकते. त्याच गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान-२ पाठवले परंतु काही तांत्रिक कारणांमुळे ते सुध्दा अपयशी ठरले. परवाचीच गोष्ट आहे ( २७ ॲाक्टोबर २०२० ) , नासा ( NASA ) च्या सोफिया टेलीस्कोप ने माहिती दिली की चंद्रच्या पृष्ठभागावरती पाणी आहे किंवा पाण्याचा रासायनिक जुळा ( -OH ) हायड्रॅाक्सी असावा. त्याच सोबत त्यांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केले नाही ( २८ ॲाक्टोबर पर्यंत ) आणि सांगितले की आम्हाला फक्त एक अंदाज आहे. त्याचसोबत त्यांनी असेही सांगितले कि सहारा वाळवंटापक्षा १०० पटीने जास्त पाणी किंवा त्याचा रासायनिक जुळा हायड्रॅाक्सी ( -OH ) चंद्राच्या मातीत आढळला. ह्या बातमीने शास्त्रज्ञ नव्हेच तर सर्व मानवाच्या डोक्यात वीज पेटवले तसेच विचार करण्यास भाग पाडले.


आपण हे सर्व काही संशोधन केले, करोडो-अज्बावधी डॅासर्स खर्च केले, खुप सारे पुस्तके लिहीले, खुप सारे सिध्दांत शोधले व मिटले देखील. जवळपास १०० वर्षांपेक्षा जास्त काळ गेला व हाती काय लागले ? काहीही नाही. मला सारखा एकच प्रश्न पडतो आपण ईतके करोडो-अज्बावधी ग्रह सोडुन ह्या पृथ्वी वरती जन्माला आलो आहोत, तर मग का बरे ह्या पृथ्वीला सोडुन दुसऱ्या ग्रहावरती जाऊन वास करायचे. ह्या पृथ्वीवरती आज ईतके प्रदुशन वाढले आहे की आपल्या डोक्यात एकच मार्ग निघतो तो म्हणजे दुसऱ्या ग्रहावरती जाऊन वास करावे, बस्स हा एकच विचार व एकच मार्ग. दुसरा मार्गांबद्दल विचारच केला नाही का सुचला नाही. आज पर्यंत अनेक आंतराळ संस्थांनी जवळपास १० अब्ज ट्रिलीयन डॅालर्स  दुसऱ्या ग्रहावरील माहिती मिळवण्यासाठी केली. रक्कम एवढी मोठी आहे त्यातील फक्त १% भाग ह्या पृथ्वीच्या प्रदुषनाला आवरण्यासाठी केला असतां तर पृथ्वी पहिल्या सारखी हिरवी शाल ओढल्यासारखी दिसली असती. हे तेव्हा घडले असते जेव्हा आपण फक्त १% भाग वापरू. मलाही आनंद वाटतो ह्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासाबद्दल, परंतु आपण जे काही पृथ्वी बद्दल करत आहोत ते बरोबर आहे का? आज अनेक शहरांमध्ये पिण्याचा पाणी नाहीये आणि आपण पृथ्वीवरच्या गोष्टी सोडतो आणि चंद्रावरती पाणी शोधतो. अरे आज अनेक जंगले जाळुन त्याची तेथे राख होत आहे, जीवसृष्टी संपुष्टात आहे आणि आम्ही हे बुध्दीमान मानव बाहेरच्या अनेक ग्रहावरती जीवसृष्टी शोधत आहोत. आज दुष्काळ पडत आहे, अतिवृष्टी होत आहे, शोतकऱ्याचे पीक येत नाहीये आणि आम्ही महामानव ६८.७२ किलोमीटर वरील मंगळावर बटाट्याची शेती करत आहोत. आज मी नाही काही बोलणार मी फक्त एक प्रश्न विचारेन, 

रात्री झोपताना फक्त आकाशाकडे पहा, स्वत:ला विचारा मी ह्या पृथ्वीवरती कसा ? मी ह्या पृथ्वीवरती जन्मलो, आणि मी ह्याच माझ्या घरात प्रदुषन करत आहे व बाजूच्या घरात ( दुसरे ग्रह ) काय आहे हे डोकावून पाहत आहे. माझे घर जळत आहे आणि मी शांतपणे पाहत बसलो आहे. अशा वेळेला मी काय करावे; त्या चंद्र, मंगळ, शुक्र ग्रहांवरती जावे की माझ्या पृथ्वी मातेला पुन्हा एकदा हिरवे पहावे. 

तुम्हाला उत्तर मिळाले तर मला नक्की कळवावे.





लेखक - शिवम सत्यवान मद्रेवार. 


Comments

Post a Comment