पात्रांच्या दुनियेत हरवताना...

पात्रांच्या दुनियेत हरवताना...





झाडांचे किती पुण्य ते कळी मधुन जन्म घेतात,

पहाटेचा सुर्य दिसताचपहिला प्रणाम ते करतात,

कोमजतात फुले दुसऱ्याचे रुप-सौंदर्य वाढवताना,

दुःख होते फुलांनापात्रांच्या दुनियेत हरवताना !


काहीच वाटत नाही तिला डोंगर-दऱ्यातुन मार्ग शोधताना,

अन्याय कधीच करत नाही सर्वांना जल अर्पन करताना,

रडतात नद्याजुलमी मानवाचे पाप स्वतधुवताना,

दुःख होते नदीलापात्रांच्या दुनियेत हरवताना !


प्रत्येक ऋतुंना वेळोवेळी आमंत्रणे पाठवतात,

अन्याय पाहतानासर्वांवर क्रोध व्यक्त करतात,

मावळतो सुर्यअज्ञानाचे राज्य चोहिकडे पसरताना,

दुःख होते सुर्यालापात्रांच्या दुनियेत हरवताना !


आवारात लहाणांना अंगाई गीत गाऊन झोपावतात,

ह्रदयाला जोडणारे प्रेमाचे मार्ग त्याच्यामुळेच बनतात,

काळखतो चंद्रप्रेमामधील प्रकाश मिटताना,

दुःख होते चंद्रालापात्रांच्या दुनियेत हरवताना !


पाहताच त्यांच्याकडे शेतकऱ्याचे डोळे दाटुन येतात,

ओल्या मातीचा वास घेताचबीजातुन कोंब डोकाऊन पाहतात,

गरजतात नभपोरक्या निर्सगाची व्यथा मांडताना,

दुःख होते नभालापात्रांच्या दुनियेत हरवताना !


आंब्याच्या वनापासून तृणाच्या पात्यापर्यंत सर्व वाट पाहतात,

पहिल्या पाऊसात त्यांचा थाट कवितेतून सांगतात,

थकतात मोरबरसत्या थेंबांची जत्रा पाहताना,

दुःख होते मोरालापात्रांच्या दुनियेत हरवताना !


खुप कमी वयामध्ये खुप काही शिकवतात,

लहान वयातच संपुर्ण जगभ्रमंती करतात,

दुरावतात शब्दअसत्याला मानाने आलिंगन देताना,

दुःख होते शब्दांनापात्रांच्या दुनियेत हरवताना !


प्रियकर-प्रेयसीला ते खुप जवळ आणतात,

रक्ताचे नसले तरी शब्दांचे नाते ते जोडतात,

रडतात भावनास्वत:बद्दलच इतिहास सांगताना,

दुःख होते भावनांनापात्रांच्या दुनियेत हरवताना !


तोफ-बंदुकांचे युध्द ते काहीच ओळींमध्ये संपवतात,

साहित्यकार सदैव ह्रदयाजवळ तीला ठेवतात,

मोडतात लेखण्यासराईत गुन्हेगाराला फाशी देताना,

दुःख होते लेखणीलपात्राच्या दुनियेत हरवताना !


काही पात्रे नाटकामध्येच अनोखे नाटके रचतात,

अक्षरक्षपात्रांना अनाथ करुनच मोकळा श्वास घेतात,

विसरली जातात पात्रेखऱ्या जीवनात नाटक करताना,

दुःख होते स्वतपात्रांनापात्रांच्या दुनियेत हरवताना !







कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.


Comments

Post a Comment