पात्रांच्या दुनियेत हरवताना...
झाडांचे किती पुण्य ते कळी मधुन जन्म घेतात,
पहाटेचा सुर्य दिसताच, पहिला प्रणाम ते करतात,
कोमजतात फुले दुसऱ्याचे रुप-सौंदर्य वाढवताना,
दुःख होते फुलांना; पात्रांच्या दुनियेत हरवताना !
काहीच वाटत नाही तिला डोंगर-दऱ्यातुन मार्ग शोधताना,
अन्याय कधीच करत नाही सर्वांना जल अर्पन करताना,
रडतात नद्या, जुलमी मानवाचे पाप स्वत: धुवताना,
दुःख होते नदीला, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
प्रत्येक ऋतुंना वेळोवेळी आमंत्रणे पाठवतात,
अन्याय पाहताना, सर्वांवर क्रोध व्यक्त करतात,
मावळतो सुर्य, अज्ञानाचे राज्य चोहिकडे पसरताना,
दुःख होते सुर्याला, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
आवारात लहाणांना अंगाई गीत गाऊन झोपावतात,
ह्रदयाला जोडणारे प्रेमाचे मार्ग त्याच्यामुळेच बनतात,
काळखतो चंद्र, प्रेमामधील प्रकाश मिटताना,
दुःख होते चंद्राला, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
पाहताच त्यांच्याकडे शेतकऱ्याचे डोळे दाटुन येतात,
ओल्या मातीचा वास घेताच, बीजातुन कोंब डोकाऊन पाहतात,
गरजतात नभ, पोरक्या निर्सगाची व्यथा मांडताना,
दुःख होते नभाला, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
आंब्याच्या वनापासून तृणाच्या पात्यापर्यंत सर्व वाट पाहतात,
पहिल्या पाऊसात त्यांचा थाट कवितेतून सांगतात,
थकतात मोर, बरसत्या थेंबांची जत्रा पाहताना,
दुःख होते मोराला, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
खुप कमी वयामध्ये खुप काही शिकवतात,
लहान वयातच संपुर्ण जगभ्रमंती करतात,
दुरावतात शब्द, असत्याला मानाने आलिंगन देताना,
दुःख होते शब्दांना, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
प्रियकर-प्रेयसीला ते खुप जवळ आणतात,
रक्ताचे नसले तरी शब्दांचे नाते ते जोडतात,
रडतात भावना, स्वत:बद्दलच इतिहास सांगताना,
दुःख होते भावनांना, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
तोफ-बंदुकांचे युध्द ते काहीच ओळींमध्ये संपवतात,
साहित्यकार सदैव ह्रदयाजवळ तीला ठेवतात,
मोडतात लेखण्या, सराईत गुन्हेगाराला फाशी देताना,
दुःख होते लेखणील, पात्राच्या दुनियेत हरवताना !
काही पात्रे नाटकामध्येच अनोखे नाटके रचतात,
अक्षरक्ष: पात्रांना अनाथ करुनच मोकळा श्वास घेतात,
विसरली जातात पात्रे, खऱ्या जीवनात नाटक करताना,
दुःख होते स्वत: पात्रांना, पात्रांच्या दुनियेत हरवताना !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
Ek number bhau 😍
ReplyDelete👍
ReplyDeleteBest Dada
ReplyDeleteSuper.
ReplyDeleteNice 😊👍
ReplyDeleteNice poem
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteMast
ReplyDeleteMast
ReplyDelete