बालपण !

बालपण होते आपल्या सर्वांचेच छान,

खेळताना विसरत होतो वेळेचे भान,

घरासमोरच्या वाळूमध्ये खेळते माझे मन,

लहानपणीच्या प्रत्येक कार्यामध्ये रमते बालपण !


अनेक प्रयत्नानंतर कागदाच्या तयार होतात होड्या,

चेहऱ्यावर पाहुन हास्य पाऊसालाही सुचतात खोड्या,

साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गुंतते माझे मन,

मंद अशा पाऊसात थेंबासंगे रमते हे बालपण !


सुर्य मावळताना जमत होती रस्त्यांवरती मित्र-मैत्रीणींची टोळी,

खेळ  झाल्यावर आंधळी-कोशिंबीरीचा खाल्ली लेमनची गोळी,

अजुनही अडकते विटी-दांडू मध्ये माझे मन,

सायंकाळच्या किलबिलाटांमध्ये रमते बालपण ! 


दिवसभर दादा-ताईसोबत लाहानश्या वस्तुसाठी भांडणे,

अन रात्री आजीच्या कुशीत गोष्टी ऐकत पहावे चांदणे,

हातात भोवरा येताच त्यासोबत खेळते माझे मन,

आजीच्या धार्मिक बोधकथेत रमते बालपण !


शाळेच्या रस्त्यावर तुरुतुरु चालताना हात धरायची आई,

शाळा सुटल्यावर घरी पळायची असायची खूपच घाई,

ररोजच्या रस्त्यावरतीच परतते तेव्हा माझे मन

शाळेच्या जुनाट आठवणीत रमते बालपण !

 

हातात एक रुपयाचे नाणे येताच होत असो आनंदी,

महागचा खाऊ घेताना असायची पैश्याची बंदी,

तरी सुद्धा कबुले-फुटण्यामध्ये अडकते माझे मन,

चॉकलेट पेक्षा लेमनगोळीत रमते बालपण !


पाटी-पेन्सिलच्या सरावाने पाठ झाली मुळाक्षरे,

रात्रीच्या स्वप्नातही पाठलाग गणिताचे पाढे करे,

तेच पाढे चुकताना माझ्यावरच हसते माझे मन,

मूळाक्षरांच्या बाराखडीत रमते बालपण !

 

बालपणाची निरागसता असावी सदा जीवनी,

खळखळून हसावे आठवूनी गंमत जंमत अन् कहाणी,

बालवयातील आठवावे प्रत्येकाने ते क्षण,

बाळपणातील बालपणातच रमते हे बालपण..!



( नक्की वाचा - आठवणीतील चिंटू  )



कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.

(©️ सर्व हक्क संपादीत ) 

As per section 13 Copyright Act 1957  (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.

Comments

  1. Watat aahe kadhi mothecha hou naye
    Khup chan 👌👌👍🙏

    ReplyDelete
  2. खूपच मस्त ✨👌

    ReplyDelete
  3. So chan kavita 👌mala khup avdla

    ReplyDelete
  4. शाळेतील दिवस आठवले😊😍 khup mast hoti 👍👌👌

    ReplyDelete
  5. ❤❣️khup chan
    Saglya athvni jagya zalya

    ReplyDelete

Post a Comment