पाहता पाहता चिंटूला वाचू लागलो वर्तमानपत्र,
कापलेली कात्रणांची वही करुन संपले परीक्षेचे सत्र,
पाहुनी चित्रे चिंटूची रंगवली त्याची प्रतिमा,
आनंदास तेव्हा आमुच्या राहिली नाही सिमा.
कधी दाखवले चिंटूने मित्रांना दिवसा चांदणे,
वाचले विनोदी असे आभासी ती एकमेकांची भांडणे,
मित्रमैत्रीणींमधील होती ती सर्व उत्कृष्ठ संभाषणे,
म्हणीच्या सोबतीनेच पाठ झाली वाक्यप्रचारांची जिणे.
पाऊसाळ्यापुर्वी तयार झाल्या अनेक कागदाच्या होड्या,
साचलेल्या पाण्याच्या डबक्यात खुप केल्या खोड्या,
सायंकाळी खेळण्यासाठी जमली चिंटूची टोळी,
खेळून झाल्यावर खेळ खाल्ली लेमनची गोळी !
कधी परिक्षेच्या निकालाचा कागद घेऊन गेला वारा,
तर कधी इच्छा पुर्ण करत होता तुटलेला तो तारा,
आह ! बातच वेगळी होती चिंटू व त्यांच्या थव्यांची,
जशी रात्र श्रृंगार धारण करत होती लुकलुकणाऱ्या काजव्यांची !
बदलले आमुच्या बालपणातील बालपणाचे चित्र,
आठवणीत राहतात आमुच्या चिंटू अन् चिंटूचे मित्र !
कवी - शिवम सत्यवान मद्रेवार.
(©️ सर्व हक्क संपादीत )
As per section 13 Copyright Act 1957 (Copyright Amendment Act 2012), the author or creator of the work is the first owner of copyright.
एकदम मस्त
ReplyDelete